Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नागपुरात विचित्र अपघात! विरुद्ध दिशेने आला अन् ई- रिक्षाचा कट लागून चारचाकीला धडकला

Shocking Viral Video: नागपूरमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक अपघात झालेला दिसून येत आहे. अपघात कसा घडला ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Nagpur Accident Video: नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक विचित्र अपघात घडलेला आहे. सध्या सोशल मीडियावर घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओत तुम्हाला, रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होत असताना दिसत आहे. दरम्यान, त्या रस्त्यावरुन एका बाजूने एक ई- रिक्षा जात असते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार दुचाकीस्वाराला ई रिक्षाचा कट लागतो आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या चार चाकीला तो धडकला जातो. अपघात इतका जोरदार होता की दुचाकी चालक दूर फेकला जातो.

घटनेनंतर परिसरातील नागरिक तात्काळ जखमी व्यक्तीच्या दिशेने धाव घेताना व्हिडिओत दिसत आहे. ही संपूर्ण घटना जवळील दुकानाबाहेर असलेल्या सीटीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाता संदर्भात अद्याप पोलीस तक्रार दाखल झाली नसून अपघातांचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर वायरल होत आहे.

नागपुरातील घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत विचित्र अपघात! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण'', असे लिहिले आहे. अपघात पाहिल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील बऱ्याच लोकांनी दुचारीस्वाराची चुकी दाखवली आहे.

टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

SCROLL FOR NEXT