A mother’s instant reaction after a car runs over her toddler caught on CCTV a moment that shocked the nation  Saam Tv
व्हायरल न्यूज

गाडीच्या चाकाखाली आला चिमुकला; आईच्या किंचाळ्या ऐकून काळीज हादरेल

Little Boy Accident: तीन वर्षाच्या चिमुकल्यावरून गाडी गेल्यानंतर आईने जे केलं, ते पाहून अंगावर काटा येईल. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आईच्या भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tanvi Pol

Gujarat Shocking News: आई आणि लेकरामधील नातं हे शब्दांत वर्णन करता येणारं नसतं. आई म्हणजे माया, प्रेम, धैर्य शिवाय संकटात देखील कणखरपणे उभं राहणारं बळ. नुकत्याच समोर आलेल्या एका हृदयद्रावक घटनेत याची प्रचिती पुन्हा एकदा दिसून आली आहे. ही घटना जितकी अंगावर शहारे आणणारी आहे, तितकीच आई या शब्दाची खोली समजावून देणारी देखील आहे.

घटना काय घडली?

ही घटना गुजरातमधील असल्याचे समजते. तेथिल एका घराच्या बाहेर घडली. घराच्या बाहेर चिमुकला खेळत असतो. खेळता-खेळता तो मुख्य रस्त्यावर जाण्याचा प्रयत्नात असतो, पण त्या क्षणी तेथून एक चारचाकी वाहन येते आणि त्या मुलाच्या अंगावरुन जाते. मात्र ज्या क्षणी घटना घडली तेवढ्यात चिमुकल्याच्या आईला सर्व समजते ते पळत पळत वाहन थांबवते आणि आपल्या चिमुकल्याचा(Little Boy) जीव वाचवते. काही क्षणांतच घडलेला आरडाओरडा, गोंधळ, घाबरलेले लोक आणि एका आईचा हृदयाचा ठोका थांबलेला हे सगळं दृश्य अगदी मन हेलावून टाकणारं आहे.

गाडी अंगावरून गेल्यानंतर…

या घटनेत त्या आईचं काय झालं असेल? प्रत्येक आईला आपलं मूल हे जीवापेक्षाही अधिक प्रिय असतं. पण त्या आईने एक क्षणही न दवडता, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत, किंकाळ्या फोडत मुलाजवळ धाव घेतली. अंगावरून गाडी गेल्यानंतर त्या चिमुकल्याची अवस्था पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला.मात्र, त्या आईने घाबरून न जाता, गोंधळून न जाता, जे केलं ते खरंच शब्दाच न मांडता येणार आहे. त्या क्षणी तिने आई म्हणून आपली जबाबदारी ओळखली आणि मुलाला वाचवण्यासाठी जीवाचे रान केले

व्हिडिओ व्हायरल, लोकांमध्ये संताप

संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही(Video) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आणि काही तासांतच व्हायरल झाला. अनेकांनी वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT