Buldhana MLA video viral Saam tv
व्हायरल न्यूज

Buldhana MLA video viral : शिंदे गटाच्या आमदाराचा कारनामा, तलवारीने केक कापला अन् मुलाला भरवला; VIDEO तुफान व्हायरल

Buldhana MLA Cake Cutting Video Viral : भरकार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदाराने तलवारीने केक कापून मुलाला भरवला. यानंतर संजय गायकवाड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

बुलढाणा : बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याच आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांनी मुलाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. मुलाच्या वाढदिवसाला आमदार संजय गायकवाड यांनी चक्क तलवारीने केक कापून मुलासहीत कार्यकर्त्यांना भरवला. तलवारीने केक भरवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर बुलढाण्यात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. बुलढाण्यात शुक्रवारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र, युवासेना कार्यकारणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्या शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या वाढदिवसाचा कार्यक्रम शहराच्या मुख्य रस्त्यावरच आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे वाहतुकीचा रस्ता ठप्प झाला होता.

मुलाच्या वाढिवसाच्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवला. तसेच त्यांनी प्रस्तावित कामांची यादी वाचून दाखवली. या कार्यक्रमात मुलाच्या वाढदिवसानिमित्त स्टेजवर भला मोठा केक आणण्यात आणला होता. यावेळी मंचावर गायकवाड यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी भरकार्यक्रमात तलवारीनेच केक कापला. त्यांनी केक कापल्यानंतर तलवारीच्या सहाय्याने कुटुंबातील सदस्यांना केक भरवला. चक्क तलवारीने केक कापल्यानंतर या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे.

दरम्यान, संजय गायकवाड यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीने केक भरवल्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT