Shocking Accident Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Accident: पंढरपुरात भीषण अपघात! भरधाव रिक्षाची दुचाकीस्वाराला धडक; सीसीटीव्ही फुटेज समोर

Pandharpur Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो अपघात इतका भीषण होता की व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येईल. हा व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Cctv Footage Video: पंढरपूर शहरातील एका अपघाताचा थरार समोर आला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या एका रिक्षाने दुचाकीस्वाराला उडवले. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान मुजोर रिक्षा चालक अपघातानंतर पसार झाला आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

घडलेला हा अपघात (Accidnet) पंढरपूरमधील मुख्य मार्गावर घडला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, दुचाकीस्वार आपल्या मार्गाने जात असतो. दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने त्याला धडक दिली. जोरदार धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला आणि रिक्षाचालक अपघात स्थळावरून फरार झाला. त्या मार्गावरील स्थानिकांनी ही संपूर्ण घटना पाहून लगेच पोलिसांना माहिती दिली आहे.

पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान मुजोर रिक्षा चालक अपघातानंतर पसार झाला आहे. या अपघाता प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील 'saamtvnews' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

नागरिकांमध्ये संताप

या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शिवाय व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''कायम वाहन (Vehicle)चालवताना मनाने वेग वाढवतात'' तर काही यूजर्संनी,''लवकरात लवकर त्याला पकडून कडक कारवाई करावी'' अशी मागणी केली आहे.

टीप: या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT