Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वह्या, पुस्तक, बँच बाय बाय; गरम होत असल्याने शाळेने वर्गात विद्यार्थ्यांसाठी बनवला स्विमिंग पूल

Students Viral Video: सध्या महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. काही भागात तापमान ४३ अंशाच्या वर जात आहे. त्यात उन्हाचा तडाखा इतका जास्त आहे की, प्रत्येक व्यक्ती घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करुन निघत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. काही भागात तापमान ४३ अंशाच्या वर जात आहे. त्यात उन्हाचा तडाखा इतका जास्त आहे की, प्रत्येक व्यक्ती घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करुन निघत आहे. मात्र असे काही आहेत त्यांना घराबाहेर जाणे भाग आहे. त्यात राज्यातील काही उन्हाळ्याच्या दिवसांत शाळा सुरु होत्या, मात्र कडक उन्हाळामुळे विद्यार्थी शाळेत येत नव्हते,त्यासाठी शाळा(School) प्रशासनाने मुलांना शाळेत येण्यासाठी एक भन्नाट जुगाड केला आहे. सध्या सोशल मीडियावर या जुगाडाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कन्नोजमधील आहे. कन्नोजमधील महसौनापूर गावातील एका प्राथमिक गावातील एका प्राथमिक शाळेतील हा भन्नाट जुगाड केलेला आहे. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, शाळेच्या इमारतीमधील एक वर्ग दिसत आहे. वर्गाच्या भिंतीवर आपल्याला अभ्यासासंबंधित काही पोस्टर चिटकवलेले दिसत आहेत. त्याच वर्गात असंख्य लहान लहान विद्यार्थी(Student) पाण्यात खेळताना दिसत आहेत. उन्हापासून कंटाळलेले विद्यार्थी वर्गात जमा केलेल्या पाण्यात आनंद घेत आहेत

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @indiatoday या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केल्या आहेत शिवाय त्या शाळेचे मुख्याध्यापकांनी सांगितले की, सध्या वाढलेल्या उन्हामुळे विद्यार्थांचे शाळेत येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र यावर उपाय काढणे गरजेचे होते त्यासाठी हा सर्व जुगाड आम्ही केलेला आहे. त्यानंतर शाळेत आता विद्यार्थी येत आहेत आणि आवडीने अभ्यास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची महत्त्वाची अपडेट! १५ मे पूर्वी 'हे' काम पूर्ण करा; अन्यथा PF आणि पेन्शनवर होईल परिणाम

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! कार ३०० फूट खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: वर्धा - आर्वी मार्गावरील पहाटेच्या सुमारास मोठा अपघात, पायदळ जाणारा व्यक्ती गंभीर जखमी

Heart Attack Signs : हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देते 'हे' ५ संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

SCROLL FOR NEXT