Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बापरे बाप...! माणसाला वेटोळे मारुन बसला भलामोठा अजगर; पाहताच भल्या भल्यांच्या अंगाचा उडेल थरकाप

Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादाय व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहताच प्रत्येकाच्या अंगचा थरकाप उडत आहे. नक्की काय आहे व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Snake Scary Video: व्यक्ती हा प्रत्येक प्राण्यापासून प्रचंड घाबरतो. मग ते साप असो वा लहानशी मुंगी. अंगावर एखादा किडा दिसला तरी व्यक्तीला घास फुटतो. मग लहानशा किड्याच्या जागी अंगावर एक भलामोठा साप येऊन बसला तर? सोशल मीडियावर सध्या या घटनेला साजेसा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओत चक्क एका व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर एक भला मोठा अजगर वेटोळे मारुन बसलेला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र या व्हिडिओची चर्चा सुरु असून हा व्हिडिओ पाहण्यास नेटकऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती एका कठड्यावर बसलेला आहे. ज्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची लुंगी नेसलेली आहे. व्हिडिओ सुरुवातीस पाहिला तर असे वाटले अगदी सामान्य आहे, मात्र व्हिडिओत जर तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की जो व्यक्ती बसलेला आहे, त्याच्या संपूर्ण शरीराला एका भल्या मोठ्या अजगराने वेटोळा मारलेला आहे. व्हिडिओत दिसणारी व्यक्ती कदाचित मद्यधुंद अवस्थेत असलेली वाटत आहे. त्यामुळे तो व्यक्ती झोपेत आहे. त्या व्यक्तीला सापाने(Snake) वेटोळा मारला आहे हेही समजून येत नाही. त्या व्यक्तीच्या बाजूला असलेले व्यक्ती व्हिडिओ किंचाळताना ऐकू येत आहेत.

धक्कादायक व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@gharkekalesh'या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या राज्यातील आहे आणि तो व्यक्ती कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओला लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. तर मोठ्या संख्येने प्रतिक्रियाही येत आहेत.

एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीवर अजगर चढला, स्थानिकांनी वाचवला'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहून बऱ्याच यूजर्संनी कमेट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''बापरे किती भयानक आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' अतिशय धक्कादायक आहे'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' कुठे घडले हे'' अशा प्रकारे अनेक यूजर्संनी आश्चर्यजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT