Snake Theft Sandal Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Theft Sandal: हे पहिल्यांदाच पाहिलं राव; चप्पल चोरून सापाने ठोकली धूम, VIDEO व्हायरल

Snake Theft Sandal Viral Video: सापाने दारात असलेली चप्पल चोरली आहे आणि तेथून पळ काढला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ruchika Jadhav

Sanke Video Viral:

बेरोजगारी, सवय आणि मानसिकता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे व्यक्ती चोरी करतात. चोरीच्या आजवर अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांकडून चोरीच्या सर्व घटना उघड करण्याठी काम सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर चोरीचा एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही चोरी कोणत्या माणसाने नाही तर चक्क सापाने केली आहे. व्हिडीओमध्ये (Video) एक साप मानवी वस्तीत शिरला आहे. काही वेळाने एका घरासमोर हा साप येतो. येथे घरातल्या व्यक्तींच्या चपला असतात. सापाला यातली एक चप्पल आवडते की काय आणि तो थेट चप्पल घेऊन तेथून निघून जातो.

साप (Snake) चप्पल घेऊन जात असतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @abhishek_patel_pavan या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ पोस्ट करत या मुलाने त्यावर चप्पल चोर असं लिहिलं आहे. व्हिडीओवर आतापर्यंत लाखोंच्या घरात लाइक्स आलेत.

सापाने ही चप्पल नेमकी का घेतली असेल असा प्रश्न नेकऱ्यांना पडला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्यात. तर काहींनी या व्हिडीओवर हसण्याचे ईमोजी पोस्ट केलेत.

शनिवारी देखील सापाचा एक असाच अतरंगी व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडिओमध्ये एक साप थेट हॉस्पिटलमध्ये गेला होता. रुग्णालयातील ICU मध्ये साप आल्याने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात घबराट पसरली. नंतर काही सर्पमित्रांनी या सापाला निसर्ग अधिवासात सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT