समोसा आणि जिलेबी खाणं हे आरोग्यास धोकादायक असू शकतं...आणि आता या खाद्य पदार्थांवरही वॉर्निंग स्टँप लावावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज व्हायरल होत असल्याने संभ्रम निर्माण झालाय...पण, खरंच समोसा आणि जिलेबी हे धोकादायक आहेत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने समोसे, जिलेबी यांसारख्या पारंपरिक भारतीय पदार्थांवर आरोग्यविषयक इशारा जारी केलाय. खाद्यपदार्थांवर आता वॉर्निंगचे स्टॅम्प लावावे लागणार.हा अहवालाचा मेसेज व्हायरल होताच, लोकांमध्ये घबराट पसरलीय...काहींना तर असेही वाटू लागलंय की सरकार भारतीय स्ट्रीट फूडवर बंदी घालणार आहे...त्यामुळे खरंच सरकारने असा निर्णय घेतलाय का...? सिगारेटसारखेच हे पदार्थ हानिकारक आहेत का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...असा सरकारने निर्णय घेतलाय का हे जाणून घेतलं...त्यावेळी आम्हाला काही माहिती मिळाली...मग काय सत्य समोर आलं पाहुयात..
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा असा कोणताही आदेश नाही
समोसे, जिलेबीबाबत नकारात्मक टिप्पणी केलेली नाही
ही सूचना केवळ अन्न सुरक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना
कोणत्याही विशिष्ट भारतीय पदार्थाशी यात संबंध नाही
खाद्यपदार्थांवर वॉर्निंगचे स्टॅम्प लावण्याचे आदेश नाही
प्रत्येक खाद्यपदार्थ प्रमाणातच खायला हवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे...काही ठिकाणी तेलही निष्कृष्ट दर्जाचं वापरलं जातं...उपहार गृहात स्वच्छताही नसते...त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो...आरोग्य किंवा सरकारी धोरणांचा विषय येतो...तेव्हा पीआयबी, सरकारी वेबसाइट्स किंवा मंत्रालयाच्या ट्विटर हँडल्ससारख्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा...नाहीतर कुणीतरी खोडसाळपणा करून दिशाभूल करतं...आमच्या पडताळणीत समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.