Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Police Viral Video: ट्रॅफिक पोलिसाची दुचाकीस्वाराला मारहाण, संभाजीनगरमधील व्हिडिओ व्हायरल

Viral Video: संभाजीनगरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पोलिस हवालदार एका दुचाकीस्वाराला मारहाण करताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sambhaji Nagar A Two Wheeler Boy Beaten By Police Constable Video Viral:

संभाजी नगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसाने एका वाहनचालकाला बेदम मारहाण केली आहे. ट्राफिक पोलिसांनी केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक ट्राफिक पोलीस हवालदार एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. पोलीस भरदिवसा रस्त्याच्या मधोमध एका दुचाकीस्वाराला लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहे. व्हिडिओत तरुण हात जोडून पोलिसांना विनंती करताना दिसत आहे. परंतु पोलिस तरुणाला मारायचे थांबत नसल्याचे दिसत आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीसांनी या तरुणाला का मारले याचे कारण अजून समोर आलेले नाही. (Latest News)

Darshan soni या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'ट्राफिक वाल्याची दादागिरी बघा. हे खूप जास्त हे असामान्य आहे. नागरिकांना हात लावण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी' असं कॅप्शन देत मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे. या व्हिडिओवर मुंबई पोलिसांनी कमेंट केली आहे. आम्ही विनंती करत आहोत की, कारवाई करण्यासाठी आम्हाला या ठिकाणाची माहिती मिळावी, असं मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओची दखल पोलिसांनी घेतली आहे. तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या पोलिस हवालदारावर कडक कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिस अधिकाऱ्यावर त्वरीत कारवाई करण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे. दुचाकीस्वार हेल्मेट न घालता बाईक चालवत होता. त्यामुळे पोलीस हवालदाराने त्याला थांबवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT