Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एका सेल्फीसाठी १०० रूपये घेतेय रशियन महिला, व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं कारण...

Fuuny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका रशियन महिलेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे,ज्यात ती समुद्रकिनारी तिच्यासोबत फोटो काढणाऱ्याकडून १०० रुपये घेते.चला पहा व्हायरल व्हिडिओ.

Tanvi Pol

Russian Women Viral Video: भारतात दरदिवशी अनेक विदेशी पर्यटक येत असतात आणि हे पर्यटक भारतीयांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात.भारतातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना विदेशी पर्यटकांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नाही.विशेष म्हणजे विदेशी पर्यटकही आनंदाने त्यांच्यासोबत सेल्फी देण्यास होकार देतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ या संबंधित आहे,ज्यात एका विदेशी महिलेने भारतीयांना सेल्फी घेण्याच्या विनंतीला कंटाळून अजब जुगाड शोधून काढलेला आहे.

नेमका अजब फंडा तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक रशियन महिला आहे.जी भारतातील एका समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेली असते.मात्र त्या समुद्रकिनारी आलेला अनेक भारतीय पर्यटक वर्ग तिच्यासोबत वारंवार सेल्फी घेण्यास सांगत होता,मात्र त्या रशियन महिलेने कंटाळून तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी १०० रुपये आकारण्यास सुरुवात केली.रशियन महिला पर्यटकाने केलेला हा अजब फंडा कामही करण्यास सुरुवात झाली होती.काही भारतीय पर्यटक सेल्फी घेण्यासाठी तिला १०० रुपयेही देऊ लागला.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वत:रशियन महिलेने पोस्ट केला आहे.अंजेलिना असे रशियन महिला पर्यटकाचे नाव आहे.व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये,''तिने केलेला उपाय कसा आहे हे विचारले आहे''. सहा दिवसांपूर्वी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ९४ हजाराहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेल आहे तर मोठ्य संख्येने व्ह्यूजही मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

रशियन महिलेच्या अजब जुगाडचा व्हिडिओ नेटकरी वर्गाच्या मोठ्या पंसतील आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेटबॉक्समध्ये नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले,''ती भारतीयांपेक्षा भारतीयांना जास्त ओळखते''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''आमच्या करमंत्र्यांकडून लवकरच तुमच्यावर कर आकारला जाईल'',अशा अनेक गंमतीदार प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT