Russian girl Mumbai Saam Tv
व्हायरल न्यूज

Russian girl Mumbai : अविस्मरणीय ट्रेन...,रशियन तरूणीनं केली मुंबईकरांसोबत लोकलमध्ये धमाल; VIDEO व्हायरल

Russian girl reaction on mumbaikars local train travel : सोशल मीडियावर सध्या एका रशियन तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये तिनं मुंबई लोकलमधून प्रवास केल्यानंतर प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय.

Rohini Gudaghe

मुंबई : एका रशियन तरूणीनं मुंबई लोकलमधून प्रवास केलाय. त्यानंतर तिने मुंबई आणि लोकल अतिशय भन्नाट असल्याची प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडियावर आजकाल प्रत्येकजण आपली प्रतिक्रिया ब्लॉगिंगच्या माध्यमातून व्यक्त करतोय. अनेक लोक आपल्या देशातून दुसऱ्या देशात जातात. तेथील संस्कृती, स्थानिक गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असतात.

रशियन तरूणीचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या देखील जास्तच (Russian girl) आहे. अशाच एक रशियन तरूणीनं आपल्या मुंबईला भेट दिलीय. लोकल मुंबईची विशेष ओळख आहे. त्यामुळे तिने मुंबईतील लोकल ट्रेनची सफर केली, मुंबईकरांशी संवाद साधला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिनं मुंबई लोकलमधून प्रवास करताना आलेला अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलाय.

मुंबई लोकलचा प्रवास

या व्हिडिओमध्ये रशियन तरूणी मुंबईकरांचं भलतंच कौतुक करताना (Russian girl VIDEO) दिसतेय. खरं तर मुंबईमध्ये खूप गर्दी असते. लोकल ट्रेनमध्ये त्यामुळे चढता येत नाही. लोकांची खूप भांडणं होतात, असं या तरूणीनं मुंबई लोकलविषयी ऐकलं होतं. परंतु आता स्वत: लोकलची सफर अनुभवल्यानंतर मात्र ती चकित झालीय. आता तिनेच उलट प्रश्न केलाय (viral video) की, 'मुंबईकर बेशिस्त असतात असं कोण म्हणतं?'

भारतीयांसोबत रशियन कुडीच्या गप्पा

'लोकल ट्रेनमध्ये भारतीयांसोबत रशियन कुडीच्या गप्पा' असं म्हणत तिने हा व्हिडिओ (local train travel)स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलाय. नमस्ते दोस्तो, परदेशी म्हणून भारतीय ट्रेनचा धाडसी प्रवास केलाय. मला चांगल्या लोकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. भारतीय लोकांनी स्त्रियांशी कसं वागावं, ते माहित आहे. आदरातिथ्य आणि अविस्मरणीय ट्रेन प्रवास अनुभवाबद्दल कृतज्ञ! असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT