Running Bike Caught Fire Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Running Bike Caught Fire Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये धावत्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेत दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Gangappa Pujari

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हामुळे वाहने गरम होऊन पेट घेतल्याच्या अनेक घटना घडत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये धावत्या दुचाकीने पेट घेतल्याचे दिसत आहे. या दुर्घटनेत दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

सोशल मीडियावर एकापेक्षा एक भयंकर अपघाताचे, दुर्घटनांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यामधील काही घटना इतक्या भयंकर असतात की पाहणाऱ्यांच्याही काळजाचा थरकाप उडतो. सध्या माध्यमांवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवरुन जात असतानाच त्याच्या गाडीने पेट घेतल्याचे दिसत आहे.

सुदैवाने तरुणाने प्रसंगावधान राखत गाडीवरुन उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या दुर्घटनेत दुचाकी मात्र जळून खाक झाली. सोशल मीडियावर या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रस्त्यावरुन जात आहे. अचानक थोडे अंतर गेल्यानंतर त्याच्या दुचाकीला आग लागते. या आगीची भीषणता इतकी असते की क्षणात संपूर्ण दुचाकी पेट घेते. यामध्ये त्या तरुणाची बॅगही जळते. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच तरुण तातडीने गाडीवरुन उडी मारुन आपला जीव वाचवतो. या दुर्घटनेत भररस्त्यात दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Dharashiv : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देता व्यापारी पसार

"दीदी, मला मदतीची गरज" दहावीच्या मुलीचा पुणे पोलिसांना फोन, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

SCROLL FOR NEXT