Red Wine Flood Video Saamtv
व्हायरल न्यूज

Red Wine Flood Video: चक्क वाईनचा महापूर.. शहरातील रस्त्यांवर वाहू लागली Wine ची नदी; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल!

Red Wine Flood Video: या वाईनचा प्रवाह असा होता की रस्त्यावरून नदी वाहत असल्याचा भास होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावून गेले आहेत.

Gangappa Pujari

Portuguese Town Red Wine Flood:

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. देशात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक शहरात पुरही आले. पाण्याचे महापुर अनेकदा पाहिले असतील, पण एखाद्या शहरात वाईनचाच पूर आला तर... आश्चर्य वाटणारी ही घटना प्रत्यक्षात पोर्तुगाल मध्ये आली असून हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

शहरात पावसानंतर पूर आल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल, पण तुम्ही कधी रस्त्यांवर पाण्याऐवजी रेड वाईनचा (Red Wine Flood) महापूर पाहिला आहे का? पोर्तुगालमधील एका शहरात हा प्रकार घडला असून शहरात वाईनचा महापूर पाहून सर्वच चक्रावून गेले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

पोर्तुगालमधील (Portugal) अनाडिया शहरात ही अजब घटना घडली. पोर्तुगीज नगरपालिकेच्या रस्त्यावर अचानक रेड वाईनचा पूर आला. या वाईनचा प्रवाह असा होता की रस्त्यावरून नदी वाहत असल्याचा भास होत आहे. या पुराच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (येथे पाहा व्हिडिओ..)

समोर आलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार एका अपघातामुळे घडला. शहरातील स्थानिक वाईनरीमधील दोन टॅंकमध्ये भीषण स्फोट झाला होता. यानंतर रेड वाईनचा प्रवाह अगदी नदीसारख शहरामध्ये वाहू लागला. तब्बल २२ लाख (22 Lakh Litre) लिटर वाईन रस्त्यावर सांडली, ज्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT