Ratan Tata Passed Away Saamtv
व्हायरल न्यूज

Ratan Tata News: मैत्रीला सलाम! जिवलग दोस्त पुढे अन् रतन टाटांचे पार्थिव मागे; काळजाला भिडणारा VIDEO

Gangappa Pujari

Ratan Tata Shantanu Naidu Video: ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांचे दुखःद निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईमधील एनसीपीए याठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. रतन टाटा यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तत्पुर्वी रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेताना त्यांचा जिवलग मित्र शांतनू नायडूही सोबत होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे दुःखद निधन झाले. रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर बुधवारी रात्रीच त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी आणण्यात आले. आज सकाळी १० वाजल्यापासून हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

रतन टाटा यांचे पार्थीव नेले जात असताना त्यांचा मित्र शांतून नायडू हा बाईक घेऊन हळूहळू पुढे जात होता. शांतनूची गाडी पुढे आणि रतन टाटा यांचे पार्थिव पाठीमागे असा भावुक क्षण यावेळी उपस्थितांनी पाहिला. शांतनू आणि रतन टाटांच्या जिवलग मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. आपल्या जिवलग मित्राला अखेरचा निरोप देताना शांतनूचेही डोळे पाणावले होते. त्यांच्या या सुंदर मैत्रीचा काळजाला भिडणारा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एनसीपीए परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह उद्धव ठाकरे आले, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई, अरविंद सावंत यांनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाह आज दुपारी अडीच वाजता रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी एनसीपीएला येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation : बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल; धुळे महापालिकेची कारवाई

Navratri Kanya Pujan: कन्या पूजन करताना 'या' विशेष गोष्टींची काळजी घ्यावी...

Maharashtra News Live Updates: अबु सालेमच्या भेटीसाठी आलेले दोघे एटीएसच्या ताब्यात

Wildlife : सिंहाची पिल्लं नेमकी कधी वयात येतात? जाणून घ्या जंगलाच्या राजाची रंजक माहिती

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

SCROLL FOR NEXT