Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Mahatma Phule Song Viral: भारत देश कोणाचा? बोरकर भावंडांनी गाण्यातून दिला महात्मा फुलेंचा संदेश, व्हिडिओ व्हायरल

Rasika and Krutika Borkar Song Video: बोरकर भावंडांनी गायलेलं सुरेख गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: संगीत क्षेत्रात अनेक भाऊ-बहिणींनी त्यांची नवी ओळख निर्माण केली आहे. संगीत क्षेत्रात अजय गोगावले -अतुल गोगावले, लता मंगेशकर-आशा भोसले, साजिद खान आणि वाजिद खान या दिग्गज भावंडांनी मोठी ओळख निर्माण केली आहे. या दिग्गज कलाकारांनी अनेक हिट गाणे दिले आहेत. याचदरम्यान, बोरकर भावडांचंही महात्मा फुलेंवरील एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या बोरकर भावंडांनी गायलेलं सुरेख गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे. (Latest Marathi News)

बोरकर बहिणीपैकी रसिकाने वॉइस इंडिया सीझन २ मध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमातून रसिकाने तिच्या मंजूळ आवाजाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य केलं. त्याचबरोबर कृतिका बोरकरने देखील वॉइस इंडिया सीझन २ मध्ये भाग घेतला होता. या दोन्ही बहिणींनी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या गोड आवाजाच्या जोरावर देशभरात नवी ओळख निर्माण केली आहे.

या दोन्ही बहिणींचं महात्मा फुलेंवरील गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. 'हा ज्योतिबांचा देश हो, हा फुल्यांचा देश हो, अशा आशयाचं गाणं दोघांनी गायलं आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ नयन बोरकरनेही साथ दिली आहे. या गाण्यांवर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

बोरकर भावंडांच्या गाण्यावर अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने म्हटलं आहे की, 'खूप सुंदर रचना, रसिका, नयन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा'. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय की, 'तिघा भावंडांनी खूप सुंदर गाणं गायलं आहे'.

सोशल मीडियावरही अनेकांनी हे गाणे शेअर केलं आहे. बोरकर भावंडे इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. बोरकर भावंडांची इतरही गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

Shreya Bugde: सुंदरता काय असते? श्रेयाकडे पाहून कळेल

The Bengal Files: 'द बंगाल फाइल्स' रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींविरोधात एफआयआर दाखल

Majalgaon Dam : माजलगाव धरण ५६ टक्के भरले; बीडसह माजलगावची पाण्याची चिंता मिटली

EPFO: पीएफचे पैसे कधी आणि कसे काढू शकतात? EPFO चा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT