Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : राखी बांधताना घडलं भयंकर, तरुणाच्या दाढीला लागली आग; धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल बापरे.ज्या रक्षांबधना दिवशी भावाला ओवाळता भावाच्या दाढीला आग लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अवघ्या काही दिवसांवर राखीपौर्णिमेचा सण येऊन ठेपला आहे. सोशल मीडियावर याच सणाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.कधी भावा-बहिणीच्या मस्तीची तर कधी या नात्यांमधील हळव्या क्षणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.सध्या रक्षाबंधनाच्या दिवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात भावाला राखी बांधताना चक्क भावाच्या दाढीला आग लागते. सध्या सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओची मोठी चर्चा होताना दिसतेय.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर सर्वांपर्यंत व्हिडिओ(Video) पोहचला आहे.सध्या हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्रामवरील' ''@navneet_051''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला तब्बल १८ हजारांपर्यंत नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून अजूनही या व्हायरल व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. इतकेच नाही तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

नेमके काय घडले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण खुर्चीवर बसलेला दिसतोय आणि त्यासमोर तरुणाची लहान बहिण(sister) उभी आहे. या बहिणीच्या हातात राखी बांधण्यासाठी आरतीचे ताट आहे शिवाय याच्या बाजूला अजून एक या तरुणाची बहिण बसलेली दिसतेय.काही वेळातच बहिण भावाला ओवळण्यासाठी ते ताट त्याच्या चेहऱ्याजवळ नेते त्याच क्षणी ताटात असलेल्या दिव्यामुळे भावाच्या दाढीला आग लागते. नशीबाने काही क्षणातच दाढी विजवण्यात त्यांना यश येते.व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT