Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: राजस्थानी मुलांचा हटके स्वॅग, घरात एकटे असताना नेमकं काय करतात? व्हायरल VIDEO पाहून म्हणाल...

Viral Video On Rajasthan: राजस्थानी मुलांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. या व्हिडिओमध्ये मुलांचे नृत्य पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले असून काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण आजचा व्हिडिओ काहीसा वेगळा आणि मनोरंजक आहे. राजस्थानी मुलांचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्यांच्या अनोख्या शैलीत आणि धमाल मस्तीने भरलेल्या या डान्सने युजर्सचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये मुलांचे नृत्य पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले असून काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये त्यांच्या राजस्थानी पोशाख आणि नृत्याच्या लयीत असलेल्या भन्नाट स्टेप्समुळे हा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरणे कठीणच! इंटरनेटवर हा फनी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुले घरी एकटे असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला हे दोघेही घरातील एकांतामुळे कंटाळलेले वाटतात.

मात्र, काही वेळाने राजस्थानी गाण्याची धून ऐकताच ते अचानक नाचायला सुरुवात करतात. त्यांच्या हटके डान्स मूव्ह्स आणि उत्साहाने भरलेल्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. व्हिडिओमध्ये त्यांचे सहजतेने आणि मजेशीर पद्धतीने नृत्य करणे युजर्सना खूप आवडले आहे. या व्हिडिओने इन्स्टाग्रामवर चांगलीच धमाल उडवली असून युजर्स त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत आणि त्यावर मजेदार कमेंट्सही देत आहेत.

राजस्थानी संस्कृतीची भुरळ केवळ देशातच नाही, तर जगभरातील लोकांनाही पडली आहे. राजस्थान म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात भव्य राजवाडे, शाही भोजन, आणि सुंदर पर्यटनस्थळे. येथील रंगीबेरंगी पोशाख, अनोखे नृत्य, आणि पारंपरिक खाद्यपदार्थ ही राजस्थानच्या संस्कृतीची शान आहे. राजस्थानचे घागरा-चोली, पगडी, आणि राजस्थानी ज्वेलरी जगभरात लोकप्रिय आहेत. तसेच गट्टे की सब्जी, दाल-बाटी-चूरमा यांसारखे शाही खाद्यपदार्थ प्रेक्षकांना नेहमीच मोहवतात. राजस्थानी नृत्यशैली, जसे की कालबेलिया आणि घूमर, केवळ अभिजात कलांचे प्रतीकच नाही, तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT