Rajasthan Sandstorm  saam tv
व्हायरल न्यूज

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Rajasthan sandstorm turns day into night viral video : राजस्थानमध्ये अचानक वातावरण बदललं. तुफान वादळासह अनेक भागांत पाऊस पडला. चुरू, बीकानेर आणि सादुलपूरमध्ये थरकाप उडवणारं दृश्य होतं. रेतीच्या वादळानं दाणादाण उडवली. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nandkumar Joshi

राजस्थानातील चुरू आणि श्रीगंगानगर जिल्ह्यांत रेतीचे वादळ आलं. दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाश धूळ आणि रेतीने भरून गेलं होतं. सूर्य पूर्णपणे झाकला गेला आणि अंधार पसरला. दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. वाहनचालकांना हेडलाईट्स सुरू करावे लागले. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ७० किलोमीटर प्रतितास नोंदवला गेला. राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये निसर्गाचा हा अद्भुत आणि धक्कादायक अविष्कार पाहायला मिळाला.

चुरू, बीकानेर सादुलपूरसह आजूबाजूच्या परिसरात शनिवारी दुपारी अचानक वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. काही क्षणांत धुळीचं वादळ आलं. त्यामुळं परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भरदिवसा सर्वत्र रात्रीसारखा अंधार पसरला होता. रेतीचं वादळ इतक्या जोरात आलं होतं की आकाशात धुळीचे जणू मोठे ढग जमा होऊन ते लालसर झालं होतं. चहूबाजूला रेती पसरली होती.

अचानक आलेल्या या रेतीच्या वादळामुळं तेथील नागरिकांना प्रचंड त्रास जाणवू लागला. रस्त्यावर वाहने चालवताना चालकांना दृश्यमानता कमी असल्यानं कसरत करावी लागली. तर काही नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर बऱ्याच ठिकाणी होर्डिंग आणि पत्र्याचे शेड कोसळल्याच्या घटना घडल्या.

रेतीच्या वादळामुळं बाजारात काही वेळ शुकशुकाट होता. दुकानदारांनी नुकसान टाळण्यासाठी बाहेरील वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवायला सुरुवात केली. ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांतच वातावरण बदललं. परिसरात धुळीचे लोट पसरले होते. संपूर्ण परिसराला धुळीनं वेढा घातला होता. प्रशासन आणि संबंधित विभागांकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच काही महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गवर भिषण अपघात, दोन ठार दोन जखमी

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर हल्ला; राजकारणात खळबळ

Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Kalyan : पाण्याच्या बाटलीवरून मध्यरात्री धिंगाणा, हॉटेल चालकाला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT