Shocking Reel Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Reel Video: बाई हा काय प्रकार! रस्त्यावर दिसेल त्याला बियर दिली; पोलिसांनी केली कडक कारवाई

Distributing Beer On Jaipur Roads: सोशल मीडियावर सध्या काही तरुणांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. जिथे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी असं काही केलं की ते पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. मात्र त्याचबाजूला काहीजण पोट धरुन हसतही आहेत.

Tanvi Pol

आजच्या सोशल मीडिया युगात प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाई अनेक वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. काही वेळा हे प्रयोग मनोरंजनापुरते मर्यादित राहतात, मात्र काही वेळा कायद्याचा भंग करतात. सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरुण सार्वजनिक ठिकाणावरुन जाणाऱ्या लोकांनी बियर वाटताना दिसत आहेत.

संपूर्ण प्रकार जयपुरच्या रस्त्यावरील आहे. जिथे काही तरुणांनी प्रसिद्धीच्या नादात एक हटके आणि धक्कादायक(Shocking) प्रकार केला. त्यांनी रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या सामान्य नागरिकांना थांबवून त्यांना बियरचे बाटल्या वाटल्या शिवाय ग्लासात काढून ते पिण्यास देत होते. या सगळ्या प्रकाराचा त्यांनी रिल्ससाठी व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ काही तासांतच व्हायरल झाला आणि अनेकांनी यावर संताप व्यक्त केला.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''बरं झालं पोलिसांची चांगलीच कारवाई केली,परत असं काही करणार नाही'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नागरिकांची हाणायला पाहिजे होते'' अशा विविध संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

हा व्हिडिओ @ThePlacardGuy या अकाउंटवर काही तासा आधी अपलोड केलेला आहे. व्हिडिओ(Video) अपलोड करताच कॅप्शनमध्ये घटना कुठली आहे आणि काय घडले ते सविस्तर लिहिले आहे. याआधीही सोशल मीडियावर तरुणांईचे अनेक धोकादायक रिल्स व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT