Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Pune Viral Video: भावा यासाठी वाघाचं काळीज लागतं! पुण्यातील महिलांसमोर तरुणानं केली भलतीच डेअरिंग, व्हिडीओ व्हायरल

Tulsi Baug, Pune Viral Video: पवन वाघुलकरने हातात बॅनर घेत पुणेकर महिलांनाच टोमणा मारला आहे.

प्रविण वाकचौरे

Pune Viral News : पुणेरी पाट्यांची जगभर चर्चा असते. पुणेरी पाट्यांच्या माध्यमातून पुणेकर ज्यापद्धतीने टोमणे मारतात, ते सहजासहजी कुणालाही शक्य होत नाही. ते कसब पुणेकरांमध्येच असतं असं म्हटलं जातं.

मात्र पुण्यातील एका तरुणाने हातात बॅनर घेत पुणेकर महिलांनाच टोमणा मारला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Pune News)

इंस्टाग्रामवर तुम्ही विविध विषयाला घेऊन शेकडो रिल्स बघितल्या असतील. पुण्यातील एका तरुणाने थेट तुळशीबागेत जाऊन एक रिल्स तयार केलं आहे. पवन वाघुलकर असं या तरुणाचं नाव आहे. (Latest Marathi News)

पवनने हातात बॅनर घेत पुणेरी स्टाईलमध्ये 'पुण्यातील बायका तुळशीला कमी, तुळशीबागेला जास्त फेऱ्या मरतात', असा खोचक टोला लगावला आहे. तरुणाने तुळशीबागेत जाऊन हातात पोस्टर घेऊन उभं राहून हा व्हिडीओ शूट केला आहे.

एका काकांनी तर त्याच्या डेअरिंगला दाद देत त्याला हात मिळवत अभिनंदन केलं. पवनने बनवलेल्या रिल्सला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक जणांना लाईक केलं आहे. तर 5.8 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Himachal Pradesh Landslide : काळाचा घाला! टॅक्सीवर दरड कोसळली; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

Ghavan Recipe: नाश्त्यासाठी बनवा कोकणी स्टाईल खमंग घावणे आणि झणझणीत नारळाची चटणी; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नागपूर-केंद्रीय मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चचे आयोजन..

Saturday Horoscope : मोठी गुंतवणूक टाळा; 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब चमकणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Makeup Brush: मेकअप करताना कोणता ब्रश वापरायचा यामध्ये गोंधळ होतोय? जाणून घ्या ७ महत्त्वाचे मेकअप ब्रश

SCROLL FOR NEXT