Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : तरुणांचं जीवघेणं धाडस; रात्रीच्या वेळी धावत्या रुग्णवाहिकेला लटकून प्रवास, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Pune Viral Video: सोशल मीडियावर बऱ्याच वेळा पुणे शहरातील स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच पुन्हा एकदा पुणे शहरातील दिवेघाटातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धक्कदायक बाब म्हणजे पुण्यातील शाळा तसेच महाविद्यालयात अल्पवयीन तसेच तरुणाईचे गुन्हेगारीच्या घटनेत सहभाग दिसून येतो. त्यात पुन्हा एकदा पुणे शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात दिवे घाटातून जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या मागच्या बाजूला लटकत काही तरुण धोकादायक प्रवास करत आहेत. या संपूर्ण धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुणे शहराची चर्चा कायम सामान्य गोष्टीपासून ते शैक्षणिक क्षेत्रापर्यंत होत असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सांस्कृतिक पुणे शहराची ओळख पूर्णपणे बदलताना दिसून येत आहे. याच पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून तरुणाचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत त्यात एक तरुणी रिल बनवण्यासाठी बाईकवर जीवघेणे स्टंट (Stunt)करत होती तर त्यानंतर काही दिवसांत पुन्हा एक तरुणी एका उंच इमारतीच्या गच्चीवरुन लटकली होती. असे अनेक धोकादायक स्टंट करणारे व्हिडिओ पुणे शहरातून व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमके काय व्हिडिओत ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, संपूर्ण परिसर दिवे घाटाचा दिसून येतोय. दिवे घाटाच्या मार्गावर अनेक वाहनांची ये-जा दिसतेय त्या असंख्य वाहनांच्या गर्दीत एक रुग्णवाहिका जाताना दिसते मात्र व्हिडिओत(Video) नीट पाहिले असता. या रुग्णवाहिकेला लटकून काही तरुण जीवघेणा प्रवास करताना दिसत आहेत. या रुग्णवाहिकेला चार तरुण लटकलेले दिसत आहेत. या रुग्णवाहिकेचा वेगही जास्त असलेला दिसतोय. जर चुकूनही चौंघापैकी एकाचाही हात रुग्णवाहिकेवरुन निसटला असता तर जीवही गेला असता

पुणे (Pune)शहरातील व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर एका स्थानिक नागरिकाने कॅमेऱ्यात शुट करुन नंतर सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे. सध्या सर्व धक्कादायक व्हिडिओ @mrbeen979619या एक्स अकाउंटवरही शेअर करण्यात आलेला आहे. मात्र तरुणांनी हा स्टंट रिल्सवर प्रसिद्ध होण्यासाठी केला आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थिक होत आहे. व्हिडिओ सर्वत्र शेअर झाल्यानंतर या तरुणांचा तपास करुन त्यांच्यावर कारवाई होते का असा प्रश्न नेटकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT