Pre Wedding Photoshoot With Kingcobra Saam TV
व्हायरल न्यूज

Pre Wedding Photoshoot With Kingcobra: आता तर हद्दच झाली! कपलने चक्क नागासोबत केलं प्री-वेडिंग शूट; फोटो होतायत Viral

Kingcobra In Pre Wedding Photoshoot: सध्या सोशल मीडियावर एका प्री-वेडिंग शूटची भलतीच चर्चा रंगली आहे.

Ruchika Jadhav

Viral News: सोशल मीडियावर नेहमीच अनेक गोष्टी व्हायरल होतात. सध्या लग्नसराई म्हटल्यावर कपलमध्ये प्री- वेडिंग शूटचं ट्रेंड सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. नवरी आणि नवरा मुलगा दोघेही एकमेकांसह आधीच काही वेळ घालवतात, एकमेकांना समजून घेतात. अशात या जोडप्यांनी लग्नाआधी देखील आपल्या आठवणी चित्रित करण्यासाठी प्री-वेडिंग शूट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर एका प्री-वेडिंग शूटची भलतीच चर्चा रंगली आहे. कारण हे प्री-वेडिंग शूट कळजात धडकी भरवणारं आहे. (Pre Wedding Photoshoot)

नदी, समुद्र किंवा घनदाट झाडी अशा ठिकाणी कपल फिरण्यासाठी आणि प्री-वेडिंग शूट करण्यासाठी जातात. यासह प्री-वेडिंग शूटवेळी सुंदर कपडे अथवा विविध थीमनुसार एकमेकांसह फोटो काढले जातता. अशात एका कपलने प्री-वेडिंग शूटचे सर्व भन्नाट रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्यांनी चक्क एका विषारी किंग कोब्रासह फोटोशूट केलं आहे.

या कपलचे अनेक फोटो समोर आलेत. फोटोपाहून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तरुण आणि तरुणी दोघेही विषारी नागासमोर विविध पोज देतायत. असं विचित्र फोटोशूट करताना त्यांना जराही भीती वाटत नाही.

सुरुवातीला तरुणी एका घराबाहेर येते. त्यावेळी तिला तेथे एक विषारी आणि मोठा किंग कोब्रा दिसतो. त्यामुळे तरुणी सर्पमित्राला बोलावते. सर्प मित्र किंग कोब्राला मोठ्या चलाखीने पकडतो. हे पाहून तरुणी त्याच्यावर इंप्रेस होते आणि त्याच्या प्रेमात पडते. शेवटी सापामुळे त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली असं चित्र दिसत आहे.

नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून यावर आपला संताप व्यक्त केला आहे. फोटोपाहून नेटकरी तसेच सर्पमित्रही संतापलेत. किंगकोब्रासह झालेलं हे फोटोशूट आतापर्यंत लाखो व्यक्तींनी पाहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: दिसायला भोळे पण प्रत्यक्षात खूप चतूर असणारे मित्र कसे ओळखायचे? वाचा चाणक्य निती

Maharashtra Live News Update: कल्याण उंबर्डे परिसरात गॅस टंचाईचे पडसाद, विजय कृष्णा एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा

पुण्यातील 'त्या' तरुणाच्या हत्येची धक्कादायक माहिती समोर; मैत्रिणीच्या मेसेजनंतर भेटायला गेला, परतलाच नाही

Chanderi Saree Types: लग्नसराई आणि समारंभासाठी चंदेरी साडीचे ७ सुंदर ट्रेंडी पॅटर्न नक्की करा ट्राय

Baramati By-Election: बारामतीचा उमेदवार ठरला! सुनेत्रा पवार लढणार निवडणूक, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT