PSI Pallav Jadhav Viral Video 
व्हायरल न्यूज

PSI Pallavi Jadhav Song Viral Video: 'मी लेक भीमाची...'; PSI पल्लवी जाधवने गायलं सुमधुर गाणं, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधवच्या सुमधुर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai News: व्यक्ती कितीही मोठ्या पदावर गेला तरी तो त्याचे सुप्त गुण ओळखून असतो. प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला असते. तुम्ही उच्च पदावरील व्यक्तीलाही त्यांच्या कलेची जपणूक करताना अनेकदा पाहिलं असेल. उच्च पदस्थ पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव ही देखील हरहुन्नरी कलाकार आहे. अशीच एक हरहुन्नरी कलाकार, अभिनेत्री उच्च पदावरील पोलीस अधिकारी पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधवच्या सुमधुर गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने गायलेल्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

पीएसआय पल्लवी जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. पल्लवी जाधव तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवनवीन फोटो शेअर करते.

अभिनेत्री पल्लवीने एका सिनेमातही काम केलं आहे. पल्लवी मूळची औरंगाबादची आहे. पल्लवी जाधवला चाहत्यांनी 'ब्युटी विथ खाकी' अशी पदवी दिली आहे. पल्लवीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

पल्लवीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात स्वत: लिहिलेलं भीमगीत सादर केलं होतं. पल्लवीने गायलेलं सुमधुर गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 'मी लेक भीमाची...'अशा आशयाचं गाणं पल्लवीने भरकार्यक्रमात गायलं. पल्लवीने हे गाणं सोशल मीडियावरही शेअर केलं.

पल्लवीने गायलेल्या गाण्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी गाण्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'खूप सुंदर पल्लवी मॅडम, गाणं ऐकून अंगावर शहारा आला'. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे की, 'आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायचे आहे. हेच माझं खूप मोठं स्वप्न आहे'.

पल्लवीचं गाणं आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर लाखो चाहत्यांकडून व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत. पल्लवीने हे गाणं 'मैया यशोदा ये तेरा कन्हैया' या गाण्याच्या चालीवर गायलं. पल्लवीचं भीम गीत प्रचंड व्हायरल झालं आहे. अनेक जण या गाण्याचं कौतुक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT