A farmer demonstrates the reality behind the viral ‘plastic watermelon’ claim, debunking social media misinformation. Saam Tv
व्हायरल न्यूज

प्लास्टिकचं कलिंगड शेतकऱ्याच्या मुळावर, प्लास्टिकच्या कलिंगडचा व्हिडीओ समोर

Plastic Watermelon Viral Video Truth Fact Check: सध्या सोशल मीडियावर प्लॅस्टिकच्या कलिंगडचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या व्हिडीओत केलेला दावा थेट शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय. या व्हिडिओमागची सत्यता काय आहे? शेतकऱ्यांनी थेट रियालिटी चेक करू कोणता दावा केलाय?

Saam Tv

सध्या गरमीच्या दिवसात शरीर थंड राहावं म्हणून आपण गारेगार कलिंगड खातो. मात्र, हा व्हिडिओ नीट पाहा... या व्हिडीओत कलिंगड हिरवं गार असल्याचं दिसतंय. मात्र, हिरवंगार दिसण्यासाठी कलिंगडाला प्लास्टिकचं कोटिंग करण्यात आल्याचा दावा व्हायरल व्हिडिओतून करण्यात येतोय. व्हिडीओच्या माध्यमातून नेमका काय दावा केला जातोय पाहूयात...

कलिंगडाला प्लास्टिक कोटींगचा दावा

कलिंगड हिरवंगार दाखवण्यासाठी प्लास्टिकचं कोटिंग करण्यात आलंय

वरची साल काढून दाखवत प्लास्टिकचं कोटिंग करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.

मात्र, व्हिडीओ समोर आल्यानंतर या व्हिडिओची सत्यता एका शेतकऱ्याने समोर आणलीये. कलिंगडाला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यावरचा पापुद्रा सैल होऊन तो काढता येत असल्याचं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यानं सांगितलंय. इतकंच नाही तर प्लास्टिकच्या कलिंगडाच्या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन शेतकऱ्यानं केलंय... विशेष म्हणजे त्याचा रियालिटी चेकही या शेतकऱ्यानं करून दाखवलाय.

अनेकदा फळांना लवकर पिकवण्यासाठी किंवा ती ताजी दिसण्यासाठी केमिकल वापराचे प्रकार अनेकदा समोर येतात. त्याचाच फायदा उचलून व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण केली जाते. मात्र यामुळे उत्तम दर्जाचे उत्पादनही संशयाच्या भोवऱ्यात सापडते आणि शेतकरी नाहक अडचणीत येतो. त्यामुळे ग्राहकांनी खऱ्या खोट्यातला फरक समजून घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Bus Accident : पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भयंकर अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Manoj Jarange : पुन्हा आंदोलनाची ठिणगी!रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील करणार आमरण उपोषण; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT