Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: निष्ठा असावी तर अशी! मालकाला वाचवण्यासाठी कुत्रा थेट किंग कोब्राला भिडला, VIDEO पाहून नेटकरीही झाले थक्क

Pitt Bull Dog Cobra Snake Fight Viral Video: सोशल मीडियावर कायमच प्राण्यांचे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतात. सध्या प्राण्यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील बरेच व्हिडिओ विविध प्राण्यांचे दिसून येतात. मग प्राण्यांच्या या व्हिडिओत तुम्हाला अनेकदा 'पिटबुल' या भयंकर कुत्र्यांच्या प्रजातीचे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. पिटबुलच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती या पिटबुलपासून लांब असतो. मात्र सोशल मीडियावर पिटबुल या कुत्र्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात पिटबुलने आपल्या मालकाचे भयंकर कोब्रा या सापापासून प्राण वाचवले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) उत्तर प्रदेश जिल्ह्यातील झाशीमधील आहे. जिथे एका घराच्या अंगणात काही मुले खेळत होती असे सांगण्यात येत आहे, दरम्यान मुलं खेळताना अंगणात कोब्रा(cobra) येतो त्यानंतर अंगणात असलेल्या पिटबुल (Pitt Bull)ते पाहतो त्यानंतर मुलांचा जीव वाचवण्यासाठी कोब्रा या महाभयंकर सापाशी लढतो. सर्व व्हिडिओ एका व्यक्तीने कैद केलेला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल(Viral) करण्यात आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका घराच्या बाजूचे अगंण दिसून येत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहिले की अंगणाचा परिसर अतिशय विस्तृत आहे. मात्र याच अंगणात एक सफेद रंगांचा पिटबुल आहे जो अतिशय संतापलेला दिसून येत आहे. मात्र जर तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ नीट पाहिला तर दिसेल की, पिटबुल चक्क एका मोठ्या कोब्रा या सापाशी लढताना दिसून येत आहे.

झाशीमधील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील या अकाउंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल लाखोंच्या संख्येने यूजर्स व्हिडिओ पाहत आहेत एवढेच नाही तर व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पिटबूल नसता तर काय झाले असते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' खूपच ऐतिहासिक दृश्य आहे हे'' शिवाय आणखी एका यूजर्संनी लिहिले आहे की,''खतरनाक आहे हे'', अशा अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विष प्राशन करून शेतकरी महिलेचा मृत्यू

Pune Metro : गणेशोत्सवात पुणेकरांना मोठा दिलासा! दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो, जाणून घ्या सविस्तर माहिती

Ratnagiri Beach : चंद्रकोरासारखा दिसतो कोकणातील 'हा' समुद्रकिनारा, नजरेत साठवावे असे सुंदर रुप एकदा पाहाच

Stop eating onions: 30 दिवस कांदा खाल्ला नाही तर शरीरात घडतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT