Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : रिल्स,फोटोचं वेड काही जाईना! नदीकाठी रिस्क घेत तरुणांचं फोटोसेशन; पाहा VIDEO

Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात,अशातच पुन्हा एकदा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सर्वत्र मुसळधार पावसाने आगमन केले आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक पर्यटक विविध पर्यटक स्थळी जाताना आपल्याला दिसत आहे. निसर्गसौदर्यं आणि तेथील मनमोहक नजारा आपल्या मोबाईलमध्ये प्रत्येकजण कैद करतो.मात्र यात संतापजनक गोष्ट येते ती धोकादायक पर्यटन स्थळी जाऊन स्वता:चे फोटो आणि रील्स बनवणे.

धोकादायक ठिकाणी रील्स आणि फोटो काढण्याच्या नादात अनेक व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. परंतू पुन्हा एकदा असाच संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे,ज्यात काही तरुण-तरुणी धोकादायक असलेल्या ठिकाणी फोटो(Photo) काढत आहे,सध्या यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, व्हिडिओत दिसणारा संपूर्ण परिसर नदीचा काठचा आहे. सध्या मुसळधार पाऊस असल्याने नदीचा प्रवाह अत्यंत जास्त आहे. अशात एक तरुणी अगदी नदीच्या काठावर उभी राहिलेली आहे आणि तिच्यासोबत असलेले तरुण तिचा फोटो काढण्यात व्यस्त आहेत. काही वेळाने व्हिडिओत(Video ) तु्म्ही पाहू शकता बाकी तरुण-तरुणीही नदीच्या काठावर जाताना दिसत आहेत. जर तुम्ही कल्पना करा फोटोसाठी नदीच्या काठावर असलेल्या तरुणीचा तोल गेला असता तर ती पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहत गेली असती.

सोशल मीडियावर याआधीही असे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत,त्याव्हिडिओत पाण्याचा प्रवाह अचानक वाढून काही व्यक्ती सर्वांच्या समोर वाहत गेल्याचे दिसून आले आहेत. काही दिवसांपू्र्वी मुंबई शहरातील प्रसिद्ध रिल स्टारचा ही रिल्स बनवण्याच्या नादात दरीत पडून मृत्यू झाला. तरीही तरुणामध्ये अशा धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचा मोह सुटत नाही.

सध्या या तरुण-तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म (platform)एक्सवरील @mrbeen या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. मात्र नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर संतापजनक प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

Edited By: Tanvi Pol

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

PM Ujjawala Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच! गॅस सब्सिडीसाठी ४५ दिवसांची अट, अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच

Morning Walk Benefits : सकाळी फक्त अर्धा तास चालण्याचे हे फायदे वाचाल, तर आजच जिमला जाणे सोडाल

Education Scam : शिक्षण विभागातील सर्वात मोठा घोटाळा, सरकारलाच १५० कोटींचा गंडा, अशी झाली पोलखोल

Maharashtra Live News Update : अमरावती ठरले देशातील सर्वाधिक उष्ण शहर; 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT