Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कहरच...! हवेत फिरू लागला हेलिकॉप्टरसारखा गरागरा, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल

Viral Video: एक व्यक्ती खांबावर किंवा बांबूवर चढून जीवघेणा स्टंट करत आहे, ज्यामुळे त्याला पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सध्या सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होतंय.

Dhanshri Shintre

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कधी काय व्हायरल होईल याचा अंदाज लावता येत नाही. दररोज काहीतरी नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी दिसतात. जर तुम्ही नियमितपणे सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहत असाल. कधीकधी जुगाडाचे व्हिडिओ दुसऱ्यांपेक्षा जास्त आकर्षक असतात तर कधी मेट्रोमधील छोट्या छोट्या गोष्टींवर भांडण करणारे लोक व्हायरल होतात.

तसेच स्टंट करणाऱ्यांचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध होतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. ती व्यक्ती खांबावर किंवा बांबूवर चढताना दिसतो. तो खांबावर किंवा बांबूवर पोटावर झोपतो आणि त्यानंतर गोलाकार हालचालीत फिरू लागतो.

जितके तो फिरतो, तितके त्याचा वेग वाढतो, आणि हे पाहून असं वाटतं की जणू हेलिकॉप्टरच्या ब्लेडसारखा तो फिरत आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, पण या व्हिडिओचा कालावधी किंवा स्थानाबद्दल कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. त्याच्या कलेची ताकद आणि त्याच्या अप्रतिम स्टंटमुळे तो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडीओ ट्विटर प्लॅटफॉर्मवर '@VishalMalvi_' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यात खांब किंवा बांबूवर चढत एक व्यक्ती आश्चर्यकारक स्टंट करत आहे. व्हिडिओसाठी कॅप्शनमध्ये लिहिले होते, शेवटी खरा शक्तीमान दिसला भाऊ. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर ते पाहिलेल्या ७ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर आपले विचार व्यक्त केले. एका वापरकर्त्याने ही आत्मशक्ती आहे, ती जग बदलू शकते असं म्हटलं, तर दुसऱ्या वापरकर्त्याने "हेलिकॉप्टर-हेलिकॉप्टर" असे कॅप्शन दिले. व्हिडिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT