Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरात्रीत तरुणावर चढला क्रिकेटचा फिवर, क्रिकेट गरबाचा व्हिडिओ चिक्कार व्हायरल

Nvratri Special Viral Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात तरुणांना जरा हटके गरबा खेळला असून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: सोशल मीडियावर आजवर अनेक तरुणाईचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. कधी तरुणाईच्या हाणामारीचे तर अनेकदा भयानक स्टंटचे. मात्र सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पार पडत आहे. अशातच सोशल मीडियावर तरुणांच्या गरबा खेळण्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्या व्हिडिओत तरुणांनी हटके पद्धतीने गरबा खेळला आहे. ज्यासाठी तुम्हाला व्हायरल व्हिडिओ पाहावा लागेल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला अनेक तरुण गरबा खेळताना दिसून येत आहे. गरबा खेळत असलेल्या सर्व परिसरात नवरात्री निमित्ताने छानशी लायटिंग केलेली दिसत आहे. अशातच त्यातच तुम्ही व्हिडिओ(Video) नीट पाहिला तर दिसेल की तीन तरुण आहेत जे हातात क्रिकेटची बॅट घेऊन गरबा खेळत आहेत. हटके गरबा खेळत असलेल्या तरुणांचा व्हिडिओ तेथिल एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून तो इस्टाग्रामवरील '@akash_r_bariya034' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण २ दिवसापूर्वी व्हायरल झालेला असून तब्बल ४ हजारहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक्स केलेले असून मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटकऱ्यांच्या हटके प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर व्हिडिओला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर व्हिडिओ अन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यातही येत आहे. सध्या या व्हिडिओला यूजर्संनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''एक दिवस मी माझ्या देशाला वैभव मिळवून देईन'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' पोर काय करतील सांगता येत नाही'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पॅराग्लायडिंग करताना अपघात; पायलट १३,५०० फूट उंचीवरून कोसळला

जलसंधारण आणि वृक्ष संवर्धनासाठी बदलापूरच्या तरुणांचा पुढाकार, जांभूळ ट्रस्टच्या माध्यमातून 2.5 कोटी लिटर पाण्याची साठवण

Thane To Amravati: विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवीच्या दर्शनाला जायचंय? ठाण्याहून अमरावतीला कसे जाल, जाणून घ्या सर्वोत्तम पर्याय

Doctor Case : मृत महिला डॉक्टरचा हॉटेलमधील पहिला CCTV व्हिडिओ समोर, रूममध्ये संपवलं होतं आयुष्य

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भटके विमुक्त, बलुतेदार ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

SCROLL FOR NEXT