Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: मन जिकलं बाबा! काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं; आजोबांच्या गाण्याची सोशल मीडियावर हवा

Marathi Soul Song Video: एका आजोबांनी सुंदर गाणं गायलं आहे. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पाळतय रं, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं असे या गाण्याचे बोल आहेत.

Ruchika Jadhav

Video Viral:

आपल्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या मर्जी मालक असतो. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात बालपणापासून वृध्द होईपर्यंत अनेक प्रसंगांतून जातो. जीवनाच्या या अनुभवात खूप काही शिकायला मिळतं. जीवनाची खरी भाषा सांगणारं एक गाणं आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीवन, आयुष्य, संसार, मुलं, म्हातारपण या गोष्टी कुणाच्याही आयुष्याला चुकलेल्या नाहीत. आयुष्य जगताना आपण कुणाचं वाईट न करता, चांगल्या मनाने जगलं पाहिजे, असं सर्वच जाणकार सांगतात. आपण वाईट कर्म केले तर त्याची शिक्षा आपल्याला याच जनमत मिळत असते. मात्र अनेकदा नकळत आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडतात. समोरच्याची मने दुखावली जातात.

आता हा सर्व जीवन पसारा कुणालाही चुकलेला नाही. यावरच एका आजोबांनी सुंदर गाणं गायलं आहे. पाप करून पापी मन हे सैरा वैरा पाळतय रं, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय रं असे या गाण्याचे बोल आहेत. आजोबांनी अगदी तालात हे गाणं गायलं आहे. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.

समोर दोन डफली आणि हातात घुंगरू बांधून आजोबांनी तालासुरात हे गाणं गायलं आहे. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी या गाण्यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. क्या बात है शाहिर बापू असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर आणखी एकाने पूर्ण गाणं म्हणा बाबा अशी इच्छा व्यक्त केली आहे. @rang_marathi_official या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाइक्स माळिले आहेत. तसेच सर्वजण बाबांनी भायलेल्या भावगीताचं कौतुक करतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT