Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Shocking Video : काळ्या रंगाच्या कारचा कहर; रस्त्यावरील अनेकांना उडवलं, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

car viral video : नोएडामध्ये काळ्या रंगाच्या कारचा कहर पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील कारने अनेकांना उडवलं. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Vishal Gangurde

सोशल मीडियावर एका कारचा थरार व्हायरल झाला आहे. काळ्या रंगाच्या कारने अनेकांना उडवल्याची घटना घडली आहे. एका दुकानातील कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्यानंतर रागात कार चालकाने हे कृत्य केल्याचे समोर आलं आहे. कार चालकाच्या कृत्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नोएडामधील सेक्टर १६ मध्ये कार मार्केट आहे. या मार्केटमधील एका दुकानावर कार चालक आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाचे नाव सचिन लोहिया आहे. तो दिल्लीच्या आया नगर येथील राहणारा आहे. सचिन १० मार्च रोजी कारवर स्टीकर लावण्यासाठी कार मार्केटमध्ये आला होता. त्याच दुकानात असलेल्या एका कर्मचाऱ्यासोबत वाद झाला.

कर्मचारी आणि सचिन लोहिया या दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. कार चालक सचिने थेट दुकान मालकाला शिवीगाळ केली. यामुळे कर्मचाऱ्याने सचिन लोहियाला शिवीगाळी रोखण्यापासून रोखलं. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. सचिन लोहियाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

दुकान कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार नोएडा पोलिसांत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिसांनीही तक्रार नोंदवली. आरोपीच्या अटकेसाठी दोन पथक नेमण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अटक केली. कारवर स्टीकर लावण्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला होता.

नोएडाच्या सेक्टर १६ मध्ये कार बाजारात ही घटना घडली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कार चालक अनेक वाहनांना धडक देताना दिसत आहे. कार चालकामुळे परिसरात एकच भीती पसरल्याचं दिसत आहे. पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT