Ghost Scare in Nashik 
व्हायरल न्यूज

Nashik : नाशिकच्या निफाडमध्ये रात्री फिरतंय भूत? तरुणाला बेदम मारहाण? नेमकं सत्य काय?

Nashik News : भुताने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय...मारहाणीचे फोटो बघा, ही मारहाण भूताने केलीय असा दावा केलाय.

संदीप चव्हाण

Ghost Scare in Nashik: एक भूत फिरतंय आणि ते भूत माणसांना रस्त्यात पकडून मारतंय...हे ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल...होय, असाच एक प्रकार समोर आलाय...खरंच भूत फिरतंय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

याच भुताने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय...मारहाणीचे फोटो बघा, ही मारहाण भूताने केलीय असा दावा केलाय...मात्र, खरंच भूत आहे का...? भूताने कधी मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलंय का...?

हा आवाज आणि हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही...कारण, नाशिकच्या निफाडमध्ये रात्री भूत फिरतंय...आणि ते भूत माणसांना पक़डून मारतं असा दावा करण्यात आलाय...हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्याने ग्रामस्थ दहशतीत आहेत...या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भुताने चालकाला मारहाण केली.

या मेसेजसोबत फोटोही व्हायरल केल्याने लोकांना खरं वाटू लागलंय...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनावणे आणि सचिन बनसोडे थेट धामोरी गावात पोहोचले...त्यावेळीही गावात भूताचीच चर्चा होती...ग्रामस्थ भयभीत होते...त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेतलं...

याआधी कधी गावात भूत पाहिलंही नाही आणि असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला...त्यामुळे याबाबत अंनिसकडूनही अधिक माहिती जाणून घेतली... त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

निफाडच्या शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत असल्याची अफवा

भूताचे फोटो, व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केलेत

मारहाण केलेली व्यक्तीही समोर आलेली नाही

लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय

रडण्याचा आवाज युट्यूबवर 9 वर्षांपूर्वी अपलोड केलेला आढळला

त्यामुळे आमच्या पडताळणीत नाशिकच्या निफाडमध्ये भूत फिरतंय हा दावा असत्य ठरला...भूत हे अस्तित्त्वात नाही...लोकांना घाबरवण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...त्यावर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT