Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आधार कार्ड अपडेटला भली मोठी रांग, उभं राहण्यावरून महिलांची हाणामारी,नांदेडच्या पोस्ट ऑफिसमध्ये राडा

Women Fighting: सोशल मीडियावर बऱ्याचदा महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही काहीसा तसाच आहे. मात्र या घटनेत नेमके काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

nanded Viral Video: शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रावर मंगळवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा आधार अपडेटसाठी आलेल्या दोन महिलांमध्ये रांगेत उभ राहण्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला आणि तो प्रचंड अशा हाणामारीत रुपांतरित झाला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला तर काही काळासाठी कामकाजही ठप्प झाले. सध्या सोशल मीडिया हा प्रकार व्हायरल होत आहे.

पोस्ट ऑफिसजवळील या आधार केंद्रावर दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, त्यात महिलांची संख्याही लक्षणीय असते. एका महिलेला रांगेत डावलल्याचा आरोप करत दुसऱ्या महिलेशी वाद (Argument) सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असतानाच दोघींमध्ये हातघाई झाली. परिसरातील नागरिक आणि काही कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत दोघीही एकमेकींना ओढत खेचत मारहाण करत होत्या.

सध्या हा व्हिडिओ प्रत्येक समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या नांदेडमधील हा व्हिडिओ युट्युबवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांपूर्वीही व्हिडिओ व्हायरल होताच हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर या पूर्वी महिलांच्या हाणामारीचे (Women Fighting) शिवाय भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. अनेक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी गमंतशीर तर अनेकदा संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पण हा व्हिडिओ पाहतचा प्रत्येक नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे. एका यूजरने कमेंट केली,''वेळ, काळ तर पाहा'' दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''महिला आहेत काहीही करु शकतात'' अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : महिल्यांच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT