Video Viral Saam Tv
व्हायरल न्यूज

Video Viral: अर्रर्र मस्ती नडली! धावत्या दुचाकीवर तरुणीसोबत रोमान्स, Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

Couple Bike Stunt Video Viral: मुंबईमध्ये तरुणीसोबत बाईक स्टंट करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

Rohini Gudaghe

Mumbai Police Action After Viral Video

अलीकडे तरूणाईला स्टंट करण्याचं वेडचं लागलं आहे. त्यातही बाईक स्टंटला विशेष महत्त्व दिलं जात आहे. अनेकदा हे स्टंट जीवघेणे असतात, अनेकदा ते नियमांचं उल्लंघन करणारे (Couple Bike Stunt) असतात. मुंबईत असाच एक बाईक स्टंट करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे. त्यांचा स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. (Latest Viral Video)

काही दिवसांपूर्वा मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील उड्डाण पुलावर एका तरूणाने एका तरुणीसोबत बाईकवर थरारक स्टंट केला होता. हा स्टंट तरुणाला चांगलाच महागात पडला (Video Viral) आहे. बाईक स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वांद्रे वाहतूक पोलीस आणि वांद्रे पोलीस ठाण्याने या 24 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणीसह दुचाकीवर थरारक स्टंट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा हिस्ट्री शीटर आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. नुकतंच आरोपीचा तरुणीसह दुचाकीवर थरारक स्टंट ( Couple Bike Stunt Video Viral) केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर या तरूणाला अटक केली होती.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता तरुणाने पोलिसांसमोरच (Mumbai Police) माफी मागितली. तसंच असे स्टंट न पुन्हा करणार नसल्याची कबुली देखील दिली आहे. त्याने माफी मागितल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो तरूणीसोबत माफी मागताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या तरुण जोडप्याला जीवघेणी रोमॅन्टिक स्टंटबाजी चांगलीच अंगलट आली आहे. सध्या तरुणाईला सोशल मीडियाचं भयंकर वेड लागलेलं आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला (Mumbai News) होता. खरं तर, चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी जीवघेणे स्टंट करत असतात.

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूण जोडपं. महामार्गावर दुचाकी चालवत आहे. तरूणी दुचाकीवर उलटी होऊन बसली आहे. तरूण दुचाकी चालवत आहे. तरूणी दुचाकीवर त्याच्याकडे चेहरा करून बसलेली ( Couple Bike Stunt Video) आहे. तिने आपली ओढणी त्याच्याभोवती गुंडाळलेली आहे. अतिशय रोमॅंटिक पोझमध्ये हे जोडपं दुचाकी स्टंट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parineeti Chopra: 'सगळ्यात बेस्ट आईला...', राघव चड्ढा यांनी परिणीती चोप्राला खास स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Bhau beej History: बहिण भावाच्या नात्याचा सण 'भाऊबीज' 'दिवाळीत का साजरा केला जातो? कारण कोणालाच माहित नाही

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टँकरमधून ऑइल गळती, सटासट २२ दुचाकी घसरल्या, VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात तरुणी गंभीर जखमी

बैल पिसाळला, वाहनं अन् नागरिकांना तुडवलं; एकाचा जागीच मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT