Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video: दारुच्या नशेत महिलांच्या डब्ब्यात आला अन् पुढे जे घडलं ते पाहा; व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Train Video: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हायरल होत असलेल्य व्हिडिओत असे काही घडते ते पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

Local Train Shocking Video: मुंबई लोकल ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून हजारोंच्या संख्येने लोक यातून प्रवास करतात. अशात लोकलमध्ये अनेक घटनाही घडत असतात. लोकलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.कधी महिलांची हाणामारी तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालतात. अशातच आता मुंबई लोकल ट्रेनमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एक तरुण दारुच्या नशेत थेट महिलांच्या डब्ब्यात चढल्याचे दिसत आहे.

नेमके घडले तरी काय?

सर्व घटना चुनाभट्टी स्टेशन(Station) दरम्यानची आहे.जिथे चुनाभट्टी स्टेशनवर लोकल ट्रेन आली असता एका नशेत असलेल्या व्यक्तीने महिलांच्या डब्ब्यात प्रवेश केला.त्यानंतर ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या काही महिलांनी सर्व ट्रेनमधील प्रकार सोशल मीडियावर शेअरही केला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला नशेत असलेला व्यक्ती महिलांच्या डब्ब्यात बसलेला दिसत आहे.महिलांनी त्या व्यक्तीला खाली उतरण्यासही सांगितले, मात्र तो काही त्यांचे ऐकायला तयार नव्हता.त्याच्या अशा वागण्यामुळे डब्ब्यातील काही महिला अस्वस्थही झालेल्या आहेत.

लोकल(Mumbai Local) ट्रेनमधील व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''indians'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घडलेल्या संपूर्ण घटनेचे कारण सविस्तर लिहिण्यात आले आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक आश्चर्यजकन प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर लोकांनी या घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT