Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : लोकल प्रवासात डुलकी घेणे पडले भारी, घडलेल्या प्रकारामुळे लोकं हैराण! हा व्हिडीओ एकदा पाहाच

Mumbai Local Train Video: सध्या सोशल मीडिया मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो सध्या सर्वत्र व्हायरल झालेला आहे. नक्की मुंबई लोकलमध्ये काय झाले आहे ते तुम्ही पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम मुंबई लोकल ट्रेनसंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील हे व्हिडिओ पाहून मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक प्रसंग आपण पाहत असतो. मुंबईकर अन् आसपासच्या प्रत्येक चाकरमानी याचे आणि मुंबई लोकल ट्रेनचे अतुट नाते आहे. दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट या मुंबई लोकल ट्रेनमध्ये होत असतो. मग यामध्ये आपल्याला अनेक गंमती पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील एक गंमतीदार व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात पुरुषाचा लोकलमध्ये असताना अचानक झोपेतच तोल जातो आणि तो धाडकन खाली आदळतो. सध्या लोकल ट्रेनमधील एक मजेशीर व्हिडिओ म्हणून सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओत संपूर्ण लोकल ट्रेन दिसत आहे. मात्र या व्हिडिओत लोकल ट्रेनमधील(Mumbai Local) पुरुषांचा कंपार्टमेंट दिसून येत आहे. नंतर या व्हिडिओ सर्व पुरुष सदस्य सीटवर बसलेले दिसत आहेत तर काही पुरुष जागा नसल्याने उभे आहेत. अशातच एक लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला पुरुष एका सीटवर बसलेला दिसून येत आहे. मात्र तो झोपेत दिसत आहे. मात्र त्या व्यक्तीला अतिशय झोप आल्याने तो पेगंत होतो काही वेळात तो व्यक्ती झोपेत असताना अचानक त्याचा तोल जातो आणि खाली पडतो. हा संपूर्ण व्हिडिओ(Video) समोरच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@nilesh.warang.56'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण ६ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेला असून जवळपास आतापर्यंत व्हिडिओला ३ लाखहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर अजूनही व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेट्सबॉक्समध्ये प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' बिचारा थकलेला आहे,ही गंमतीदार गोष्ट नाही रे'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''त्याला बरं झालं समजलं नाही तु व्हिडिओ काढत होता ते'' अशा अनेक प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT