Women's Fight In Local Train Saam Tv
व्हायरल न्यूज

भयंकर! लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकींना मारलं, व्हिडिओ बघून संताप होईल

Women's Fight In Local Train: लोकल ट्रेनमध्ये वारंवार वाद आणि महिलांमध्ये हाणामारी होणं हे वारंवारच झालं आहे. पण सध्या समोर आलेला प्रकार अतिशय भयंकर आहे. जिथे महिलांची हाणामारी अत्यंत टोकाला गेली आहे.

Tanvi Pol

Women Clash Video: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला डब्यात झालेल्या भांडणाचं रूपांतर थेट तुंबळ हाणामारीत झालं. एकमेकींवर तोंडाने शिवीगाळ करत करत, दोघींनी एकमेकींना जबर मारहाण केली. विशेष म्हणजे, हे भांडण एवढं विकोपाला गेलं की यात महिलांच्या चेहऱ्यावरून रक्त येऊ लागले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटिझन्स या प्रकारावर संताप व्यक्त करत आहेत.

नेमके घडले तरी काय?

सकाळ असो वा संध्याकाळची वेळ महिला डब्यात नेहमीच गर्दी असते. अनेक महिला ऑफिस, कामधंदा, कॉलेजसाठी प्रवास करत असतात. या गर्दीत जागा मिळवण्यासाठी किंवा एका चुकीच्या स्पर्शामुळे वाद होणं नवीन नाही. मात्र, यावेळी मुंबई(Mumbai Local) लोकलच्या महिला डब्यात सुरू झालेला वाद इतका वाढला की थेट हातघाईवर आली. एकमेकींचे केस ओढणं, चापटाबुक्क्यांची सरबत्ती आणि अंगावर पडून मारहाण सगळं काही त्या काही मिनिटांत घडलं.

सोशल मीडियावर संतापाची लाट

नेमकी ही घटना पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग या तिन्हीपैकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये ही हाणामारी घडली हे समजलेलं नाही शिवाय लोकलमध्ये घडलेल्या या भांडणामागचं नेमकं कारण काय होतं याची माहितीही अद्याप मिळालेली नाही. काही प्रवाशांनी जागा मिळवण्यावरून वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींनी वैयक्तिक वादाचा संशय व्यक्त केला आहे.

लोकल ट्रेनमधील हा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ''हे काय महिलांची ट्रेन आहे की कुस्तीचं मैदान?'' अशी संतापजक प्रतिक्रिया एका यूजरने केली आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''ऐवढ्या टोकाला जाऊन कोण मारतं'' तर अनेकांनी म्हटलं,''संबंधित महिलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे''

टीप: मुबंई लोकलमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवले तर चालान लागते का? काय आहे नियम

Weight Loss : धावणे की सायकल चालवणे; वजन झटपट कमी करण्यासाठी काय फायदेशीर? १५ दिवसांत फरक दिसेल

Maharashtra Lake : आकाशाचं प्रतिबिंब अन् हिरवागार साज, महाराष्ट्रातील 'या' तलावाचं सौंदर्य आहे पाहण्यासारखं

SCROLL FOR NEXT