VIRAL VIDEO FACT CHECK saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

Mumbai Ganpati viral video: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... बुरखाधारी महिला मुंबईच्या रस्त्यावर गणपती घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय...मात्र खरचं मुस्लीम महिलेनं गणपती घरी नेलाय का? या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहूयात...

Suprim Maskar

मुंबईत बुरखा घालून एक मुस्लिम महिला हातात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन शहरात आणि रेल्वे स्टेशनवर फिरत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारी या बुरखाधारी महिलेच्या ओळखीबाबत वेगवेगळे दावे केले जातायत...अनेकांनी हा रिल पाहून याला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक मानलं... तर काहींनी गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर जाऊन लोकांसोबत फोटो व्हिडिओ काढण्याच्या या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली....तसचं काहींनी संबंधित बुरखाधारी महिला मुस्लीम नव्हे तर हिंदू असल्याचाही दावा केलाय. त्यामुळे बुरखा घालून बाप्पाची मूर्ती हातात घेतलेली ही महिला खरचं हिंदू आहे का? हा व्हि़डिओ प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलाय की खरच मुस्लीम महिलेनं गणपती घरी आणलाय? याची आम्ही पडताळणी केली... तेव्हा आम्हाला त्या महिलेचे सोशल मीडिया अकाऊंट सापडलं.. त्यात वेगवेगळे व्हिडिओ समोर आले.. त्यामुळे बाप्पासोबतच्या व्हिडिओचं सत्य काय पाहूयात...

महिलेनं व्ह्यूजसाठी बुरखा घालून रील बनवली

संबंधित व्हिडिओतील महिला मुस्लीम नाही

महिलेचं नाव अनामिका सिंह असून तिच्यासोबत दिसणाऱ्या तरुणाचं नाव दिलीपकुमार पांडे आहे

अनामिका सिंहनं सोशल मीडियातून पैसे कमावण्यासाठी अशी रिल केली

अनामिका सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे

हा व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर असे समोर आलं की, सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने या दोघांनी एका दुकानातून गणपतीची मूर्ती खरेदी केली होती. त्यानंतर मूर्ती सजवून अनामिकेनं बुरखा परिधान केला आणि गणपतीची मूर्ती हातात घेऊन मुंबईतील विविध गर्दीच्या ठिकाणी फेरफटका मारला. जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हे दोघेही मुंबईत ठिकाठिकाणी फिरून लोकाचं लक्ष वेधून घेत होते...या पब्लिसिट स्टंटवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय...आमच्या पडताळणीत गणपती घेऊन जाणारी ही बुरखाधारी महिला मुस्लीम असल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे असे दिशाभूल करणारे आणि खोट्या प्रसिद्धीसाठी बनवलेले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT