Mulund station fight SAAM TV
व्हायरल न्यूज

Viral video mumbai: एकाच मुलीच्या प्रेमात दोघेही वेडे झाले, रेल्वे स्टेशनवर गुलीगत मारामारी, लोकल ट्र्रॅकवरच एकमेकांना तुडवले

Mulund station fight: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर दोन तरुणांनी रेल्वे रुळांवर उतरून केलेल्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ट्रेन येत असतानाही सुरू असलेलं भांडण पाहून प्रवासी हादरले असून सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये दोन तरुण थेट रेल्वेच्या रूळांवर उतरून एकमेकांशी जोरदार मारामारी करताना दिसतायत. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही बाजूंनी ट्रेन येत असतानाही त्यांची भांडणं सुरूच होती. ज्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

सोशल मीडियावर भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओनुसार, हा प्रकार स्टेशनवर गर्दी असताना घडला. दोन्ही तरुण अचानक भांडण करत असतानाच प्लॅटफॉर्मवरून खाली उतरले आणि रूळांवरच एकमेकांवर मारहाण करू लागले. उपस्थित प्रवाशांना ही घटना पाहताच धक्का बसला. यावेळी काहींनी ही घटना त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केली. तर काही नागरिकांनी पुढाकार घेत दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगी दोन व्यक्तींनी धाडस दाखवत रूळांवर उतरून त्या तरुणांना वेगळं केलं. त्यापैकी एका व्यक्तीने परिस्थितीची गंभीरता ओळखून दोन्ही बाजूंनी ट्रेन येत असल्याचं लक्षात घेतलं आणि एका तरुणाला उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं. या धाडसी कृतीमुळे मोठा अपघात टळला. मात्र, प्लॅटफॉर्मवर आल्यानंतरही दोघांमधील वाद काही थांबला नाही, आणि ते पुन्हा भांडू लागल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांमधील वाद एका मुलीवरून झाल्याचं समोर येत आहे. तरीही, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परंतु या घटनेनंतर इतर प्रवाशांनी अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी केली आहे.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

डायबिटीजमध्ये मसूर डाळ खावी का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'ही' डाळ आहे सर्वात बेस्ट!

Rule Change From Today: तुमच्या कामाची बातमी! UPI, LPG, पेट्रोलपर्यंत आजपासून या नियमांत बदल, पाहा A टू Z माहिती

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी खुशखबर, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या ताजे दर

SCROLL FOR NEXT