Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कमालच...! माकड घरकामात कशी मदत करतो? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी हैराण

Viral Video On Monkey: सोशल मीडिावर अनेक माकडांच्या हुशारीचे व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये माकड घरातील विविध कामांमध्ये मदत करताना दिसत आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर रोजच वन्यजीवांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि नेटकऱ्यांना हे पाहायला खूप आवडते. काही व्हिडीओंमध्ये प्राणी मजेशीर कृती करताना दिसतात, तर काहींमध्ये त्यांचा आश्चर्यकारक कौशल्यांनी लोक थक्क होतात. सध्या असाच एक अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड घरातील कामे करताना दिसत आहे. माणसासारखे वागणारे हे माकड पाहून नेटकरी अचंबित झाले असून हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एक माकड घरकामात मदत करत आहे. विशेष म्हणजे, ते अगदी कुशलतेने टॉवेल घडी करण्याचे काम करत आहे, प्रथम तो एक मोठा टॉवेल नीट घडी करुन ठेवतो . असेच एक एक करुन तो सर्व टॉवेल व्यवस्थित घडी करुन एका जागी ठेवतो. हे दृश्य पाहून लोक थक्क झाले आहेत. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि काम करण्याची पद्धत मनमोहक असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या माकडाच्या हुशारीचे कौतुक केले आहे.

माणसांचे अनुकरण करण्यात पटाईत असलेली माकडे हे किती बुद्धिमान आहेत, याचा प्रत्यय या व्हिडिओतून येतो. ही पहिलीच वेळ नाही की, माकड अशा प्रकारे घरकाम करताना दिसले आहे. याआधीही अनेक व्हिडिओंमध्ये माकडे कपडे धुणे, भांडी साफ करणे आणि भाजी चिरणे यांसारखी कामे करताना पाहायला मिळाली आहेत. या माकडाची हुशारी पाहून नेटकरी थक्क झाले असून, व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे.

हा मजेदार व्हिडीओ ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Yoda4ever या अकांउटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच "मी मदत करतो..." असे मजेशीर कॅप्शनही देण्यात आले आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून तो प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत सुमारे १ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे, तर ३७०० पेक्षा जास्त लोकांनी त्याला लाइक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने विचारले, "मी त्याला माझ्या घरी आणू शकतो का?" तर दुसऱ्याने लिहिले, "अशा हुशार माकडांना खरोखर नोकरी द्यायला हवी!" नेटकरी या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रेम दाखवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT