A viral video claims that ATMs can be hacked using a mobile app, but cyber experts confirm that such claims are false and misleading. saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: ATM हॅक करणारं अॅप? ATMमधून पैसे काढणं असुरक्षित?

Atm Hack Viral Video Fact Check India: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता दावा करण्यात आलाय की मोबाईलमधील अॅपमधून ATM हॅक करता येतं...एक व्हिडिओही व्हायरल करण्यात आलाय...पण, खरंच मोबाईल अॅपने ATM हॅक करणं शक्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

...सध्या या व्हिडिओने खळबळ उडालीय...व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की, ज्या अॅपने काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील ई-रिक्षा बंद पाडली होती, तेच अॅप आता एटीएमलाही आपल्या इशाऱ्यावर नाचवत आहे...मोबाईल स्क्रीनवर एक क्लिक होतं...आणि एटीएम व्यवस्थापनाचा कर्मचारी नसलेली एक अज्ञात व्यक्ती एटीएम मशीन थेट बंद आणि चालू करताना दिसतेय...

व्हायरल व्हिडिओत दोन लोक BAT-BMS सारख्या इंटरफेस मोबाईल अॅपवर काहीतरी क्लिक करतायत...समोरील एटीएम बंद-चालू होतंय...दोघांनी चेहरे लपवलेयत...आणि मोबाईलमधील अॅपमधून कसं एटीएम बंद करता येतं हे दाखवत आहेत...हा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने खरंच पैसे आपले सुरक्षित आहेत का...? एटीएममधून पैसे काढल्यानंतर आपला पासवर्ड, एटीएम क्लोनिंग तर होत नाही ना...? असे सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...याआधी मोबाईल एॅपवरून धावत्या रिक्षा बंद केल्याचा प्रकार उघडकीस आला...त्यामुळे आता एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय...पण खरंच एटीएम इतक्या सहजासहजी एटीएम हॅक होऊ शकतं का?

याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने सायबर एक्सपर्टची मदत घेतली...खरंच मोबाईल अॅपवरून एटीएम बंद करणं शक्य आहे का...? हे जाणून घेतलं...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

ई-रिक्षा आणि एटीएमच्या तंत्रज्ञानात बराच फरक आहे

ई-रिक्षांत वापरले जाणारे चिनी 'बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम'

भारतात ATM बँकांच्या इन्क्रिप्टेड नेटवर्कवर चालतात

बॅटरीवर चालणारे ATM अॅपने बंद होऊ शकतात

ग्राहकांच्या पैशांना यामुळे धोका नाही

भारतात एटीएम अत्यंत सुरक्षित आणि बँकांच्या इन्क्रिप्टेड नेटवर्कवर चालतात...तरीदेखील ATM बॅटरीवर चालणारे असतील तर बंद होऊ शकतात असा दावा सायबर तज्ज्ञांनी केलाय...त्यामुळे ​अशा फसव्या आणि अनधिकृत अॅप्सच्या आहारी जाऊ नका...कठोर कारवाई होऊ शकते...त्यामुळे आमच्या पडताळणीत भारतात मोबाईल अॅपने ATM हॅक होऊ शकतं हा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वसई-विरार 3 दिवस अंधारात, लोकल सेवा ठप्प, वसई-विरारचा समुद्र, महापालिका ढिम्म, लोकप्रतिनिधी गप्प

महापुरात अवतरला 'स्पायडरमॅन', स्पायडरमॅन नागरिकांच्या मदतीला

राम मंदिरातील चोरांचा आणखी एक कारनामा, बनावट पावत्या देऊन भाविकांची लूट

विरोधी पक्षनेता कोण? उपसभापतींनी दिले मोठे संकेत|VIDEO

विलीनीकरण की NDAमध्ये जाणार? आमदारांच्या बैठकीत काय ठरलं? शरद पवार गटातील नेत्यानं सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT