MLA Fight In Vidhan Sabha 
व्हायरल न्यूज

MLA Fight : विधीमंडळ की कुस्तीचा आखाडा? आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी, Video Viral

MLA Fight In Vidhan Sabha: मदतविषयक विशेष सहाय्यक नेक मोहम्मद दावर यांच्या समर्थकांनी दक्षिण वझिरीस्तानमधील पीटीआय आमदार इक्बाल वझीर यांच्याविरोधात अपशब्द वापरले. दोन दिवसांपूर्वी मोहम्मद दावर आणि इक्बाल वझीर यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वाद झाला होता.

Bharat Jadhav

पाकिस्तानच्या विधीमंडळात आमदाराची चर्चा न होता थेट हाणामारी झाल्याची घटना घडलीय. पाकिस्तानच्या विधानसभेतील या गदारोळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदारांमध्ये जोरदार लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे. खैबर पख्तूनख्वा विधानसभेत ही घटना घडली.

पीटीआयच्या एका आमदाराने कॅबिनेट मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मंत्र्यांच्या समर्थकांना हे आवडले नाही. यानंतर घरातच गोंधळ सुरू झाला. दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

आमदारांमधील भांडणाचा हा व्हिडिओ गुलाम अब्बास शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलाय. त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिले की, 'पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा विधानसभेत सरकार आणि विरोधी सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी हाणामारी केली कपडेही फाडले.'

मंगळवारी खैबर पख्तूनख्वा विधानसभेत विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. विधीमंडळाचे कामकाच चालू असतानाच हा गदारोळ झाला. मदतविषयक विशेष सहाय्यक नेक मोहम्मद दावर यांच्या समर्थकांनी दक्षिण वझिरीस्तानमधील पीटीआय आमदार इक्बाल वझीर यांच्याविरोधात अपशब्द वापरले.याच्या दोनच दिवसांपूर्वी मोहम्मद दावर आणि इक्बाल वझीर यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वाद झाला होता. यानंतर दोघांचे समर्थक एकमेकांना भिडले होते. यामुळे मागील भांडणाला फोडणी विधीमंडळात मिळाली आणि वाद टोकाला गेला.

विधानसभेत उपस्थित सुरक्षा दलांनी दोन्ही पक्षांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणाचेही ऐकायला तयार नव्हते. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. अखेर त्यांना शांत करण्यात तो यशस्वी झाला. विधानसभा अध्यक्ष सभागृहातून बाहेर पडताच गोंधळ आणि हाणामारी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Leopard : मीरा भाईंदरच्या हायप्रोफाईल सोयटीत घुसला बिबट्या; ३ जणांवर केला हल्ला, अंगाचे लचके तोडले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले; २२ अन् २४ कॅरेटचे भाव किती? वाचा सविस्तर

VIDEO: दादरमध्ये खळबळ, तरुणाच्या या इमारतीवरुन त्या इमारतीवर उड्या

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

SCROLL FOR NEXT