Nandurbar Raiway Station Drama Saam TV
व्हायरल न्यूज

Nandurbar Raiway Station Drama: रेल्वेच्या हायटेन्शन लाइनवर चढलेल्या तरूणानं 'टेन्शन' वाढवलं; अख्खी रेल्वे केली ठप्प, प्रवासी लटकले

Man On High Tension Line: रेल्वे रुळांवरील हायटेन्शन लाइनवर तरूण चढला. बराच वेळ हा ड्रामा सुरू होता. अखेर वीजपुरवठा खंडित करावा लागला. हा तरुण मनोरुग्ण असल्याचं समजलंय.

Ruchika Jadhav

Nandurbar News:

नंदुरबार (Nandurbar) रेल्वे स्थानकावर एक डोकं चक्रावणारी घटना घडली आहे. रेल्वे रुळांवरील हायटेन्शन लाइनवर तरूण चढला. बराच वेळ हा ड्रामा सुरू होता. अखेर वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळं रेल्वे वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळं लांब पल्ल्याच्या गाड्या स्टेशनवरच थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळं शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला. हा तरुण मनोरुग्ण असल्याचं समजलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोरुग्ण व्यक्ती रेल्वेच्या हायटेन्शन लाईनवर चढल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे रेल्वे वाहतूक बंद झालीये. रेल्वे (Train) वाहतूक विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांना हाल सोसावे लागतायत. भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णता विस्कळीत झालीये.

मनोरुग्णाला हायटेन्शन लाईनवरून खाली उतरवण्यासाठी प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडालीये.

नंदुरबार रेल्वे स्थानकावर हा मनोरुग्न वीज प्रवाह करणाऱ्या एका विद्युत वाहिनीवर चढल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे. ही वीज पुरवठा वाहिनी बंद करण्यात आल्यामुळे, रेल्वे वाहतूक सेवेवर त्याचा दुष्परिणाम झाला असून, एक रेल्वे गेल्या एक तासापासून स्थानकावर उभी आहे.

मनोरुग्णाला वीज वाहिनीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मनोरुग्ण ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारो प्रवासी हे स्थानकावर ताटकळले असून, काही रेल्वे या अर्ध्या रस्त्यातच थांबवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT