Viral CCTV Video  x
व्हायरल न्यूज

स्कूटीवरून आला; लेकीसमोर आईला KISS करुन पळाला, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

Viral CCTV Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने महिलेची छेड काढल्याचे पाहायला मिळते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Yash Shirke

मुलीसह रस्त्यावरुन जात असलेल्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आले. स्कूटरवरुन जाणाऱ्या तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही समजण्यापूर्वी त्याने महिलेचे चुंबन घेतले. त्यानंतर छेड काढणारा तरुण स्कूटरवरुन पळून गेला. ही संपूर्ण घटना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. ही घटना उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कूटरवरुन येणाऱ्या एका तरुणाने बुरखा घातलेल्या महिलेची छेड काढली. ही महिला तिच्या लहान मुलीसोबत रस्त्यावरुन चालत जात होती. समोरुन येणाऱ्या एका स्कूटरस्वाराने महिलेचे चुंबन घेतले. महिलेला काही समजेल याच्या आत स्कूटरस्वार तरुण पळून गेला. त्यानंतर ती महिला ओरडत राहिली.

ही घटना मेरठच्या लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरातील अहमदनगर भागात घडल्याचे म्हटले जात आहे. एका स्कूटरस्वाराने बुरखा घातलेल्या महिलेशी अश्लील वर्तन केले. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचे चुंबन घेतले. महिला काही करेल याच्या आत तरुणाने धुम ठोकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

पोलिसांनी पीडित महिलेची चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध सुरु केला. तरुणाला लवकरच अटक होईल असा दावा पोलिसांनी केाल आहे. आरोपी तरुणाची ओळख पटवण्यासाठी जवळत्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. आरोपी कोण आहे हे शोधून काढण्यासाठी सोशल मीडियावरुनही माहिती गोळा केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT