viral video instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: 'माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का..' भावाच्या कलेला तोडच नाय; Video एकदा पाहाच

Dr. Babasaheb Ambedkar Song On Piano: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय , ज्यात एक तरुण बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजतवाना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

सोशल मीडिया हे प्रसिध्दी मिळवण्याचं प्रमुख साधन बनलं आहे. जेव्हा सोशल मीडियाचा वापर खूप कमी होता, त्यावेळी प्रसिध्दी मिळायला कित्येक वर्ष निघून जायची. मात्र आता एक व्हिडिओ व्हायरल झाला की, तो व्यक्ती रातोरात प्रसिद्ध होऊन जातो. असाच काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

तुम्ही युट्यूब किंवा इंस्टाग्राम उघडलं की, तुमच्या फिडवर एक व्हिडिओ नक्कीच दिसला असेल. ज्या व्हिडीओत एक पियानो वादक बुलबुल वाजवताना दिसत असेल. पियानो आणि बुलबुल यांचा संगम होऊन हा वादक मधूर गाणं वाजवाताना दिसून येतोय. या वादकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेन्डिंगला आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा banjo_kalakar या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळ्या रंगाचं जॅकेट घातलेला वादक आधी पियानो मग बुलबुल आण मग पुन्हा पियानो वाजवून बाबासाहेब आंबेडकरांचं मधूर गाणं वाजवाताना दिसून येतोय.

वादकाने माझ्या भिमराया वाणी सांगा पुढारी होईल का.. हे गाणं वाजवलं आहे. या पियानो वादकाला ढोल वाजवणाऱ्यांचीही चांगलीच साथ मिळाली. हे मधूर संगीत ऐकून सर्वच मंत्रमुग्ध झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. यासह नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसून येत आहेत.

एका युझरने लिहिले, ' हे फक्त संगीत नाहीये....ह्या गाण्यात आमच्या बाबासाहेबांचे कर्तृत्वाच्या गाथा आहे...; तर आणखी एका युझरने कमेंट करत लिहिले, ' भाऊ तुला आदराचा स्वाभीमानाचा निळा भडक कडक जय भीम गाण वाजवून आणि त्याच पोटतिडकिणी जेव्हा स्वर आले तुमच्या तोंडातून सुज्ञानाचा निर्मळ झरा.. वा क्या बात है दादा खरच या १ जानेवारी क्रांतिदिनी या धम्मबांधवाकडून मानाचा जय भीम..'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

SCROLL FOR NEXT