Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गणिताचं टेन्शन मिटलं!, शिक्षकानं लढवली युक्ती; Dance पाहून म्हणाल हे काय आता?

Maths Formula Viral Video: सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील गणिताची गोडी नक्की लागेल असे म्हणायला हरकत नाही.

Manasvi Choudhary

सोशल मीडिया (Social Media)हे एक प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक घडामोडींचा शोध घेणे सहज शक्य झाले आहे. अशातच सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. रेसिपी, उपाय,कल्पना असे विविध व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर एका शिक्षकाने व्हिडीओ पोस्ट केला आहे. शाळेमध्ये गणित (Maths) हा विषय काहींचाच आवडीचा असतो. अनेकांना गणित विषयाचं नाव जरी घेतलं तरी घाम फुटतो. यामुळे गणितच काय गणिताच्या शिक्षकांची मुलांना भिती वाटते.मात्र सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील गणिताची गोडी नक्की लागेल असे म्हणायला हरकत नाही.

गणिताच्या या शिक्षकाने एक शक्कल लढवली आहे. ज्यामुळे गणिताचं तुमचं टेंशन दूर होईल. गणित विषय किंचकट वाटला तरी या शिक्षकांने गणित विषयाची मुलांना कशी गोडी लागेल? असा फंडा शोधलाय आहे. त्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या गणिताच्या सुत्रांचा डान्स स्टेप्स केल्या आहेत. अतिशय हटके पद्धतीचा हा डान्स आहे. @dancingprofessor या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये डान्स स्टुडिओमध्ये मुलगा डान्स करताना दिसतोय. पण तुम्ही नीट पाहाल तर हा मुलगा गणिताच्या फॉर्म्युलावर स्टेप्स करतो ज्या पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.सुरुवातील हा तरुण गणितामधील असलेला एक फॉर्म्युला म्हणजेच 'अधिक' त्यानंतर वजाबाकीची स्टेप्स करत आहे. सध्या या तरुणाचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. या अनोख्या युक्तीवर अनेक नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT