Sambhajinagar Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Sambhajinagar Video: संभाजीनगरमध्ये मोठा दरोडा! ८ किलो सोने, ४० किलो चांदी घेऊन चोरटे पसार; घटना सीसीटीव्हीत कैद

Sambhajinagar Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ एका चोरीचा आहे. नेमकी चोरी कुठे झाली आणि कशी झाली ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Viral Video: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विदेशात गेलेल्या एका नागरिकाच्या बंद घरावर दरोडेखोरांनी हल्ला चढवला असून, ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसत असल्याने हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar ) मधील वाळूज बजाजनगरमधील हा प्रकार आहे. जिथे राहणाऱ्या संतोष राधाकिशासन लड्डा यांच्या घरावर हा दरोडा पडला. संतोष लड्डा हे ८ दिवसांपूर्वी विदेशात गेले होते. त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला.

चोरट्यांनी तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीचे दागिने लपास केल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर घटनास्थळी वाळूज एमआयडीसी पोलीस आणि डॉग स्कॉडसह क्राईम ब्रँचचे अधिकारी दाखल झाले आहेत. सध्या याचा पुढील तपास सुरु केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला हा संपूर्ण प्रकार तुम्हाला saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहण्यासाठी मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सध्याच्या या घटनेचा व्हिडिओ पाहून संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

टीप: हा चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? पुण्याजवळ असलेले हे ३ किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखला पाहिजे : अण्णा हजारे

आता गट राहिलेला नाही, शिवसेना एकनाथ शिंदेंचीच; अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Mahim Fort : मुंबईचा सर्वात जुना ‘माहिम’ किल्ला कोणत्या नावाने ओळखला जायचा? वैभवशाली इतिहासात लपलेय रहस्य!

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT