सोशल मीडिया म्हटलं की दररोज नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये कधी थरारक अपघातांपासून ते मजेशीर प्रसंगाच्या घटना पाहण्यासाठी मिळत असतात. त्यातच नुकताच एक व्हिडिओ आहे जो पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे. ज्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ काही तरुणींमध्ये तुफान झटापट झालेली आहे. काहींनी त्यांचा हा प्रकार शूट करुन सोशल मीडियावर टाकला.
व्हायरल(Viral Video) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला गावाकडील परिसर दिसत आहे. या परिसरात एक मंडप आहे जिथे काही तरुणी आणि तरुण विविध गट करुन नाचत आहे. परिसरात मंडप आहे त्यावरुन वाटते की, लग्नाचा कार्यक्रम आहे. जिथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण जमले आहे. सर्व मंडपात नाचनाच्या आनंद घेत आहेत,अशातच काही तरुणींमध्ये काही कारणावरुन वाद सुरु झाला.
तरुणींमध्ये सुरु झालेला हा वाद काही वेळ तसाच सुरु राहतो. पाहता पाहता क्षणिक हा वाद तरुणींच्या हाणामारीत बदलतो. मग काय अन्य तरुणींच्या दोन गटातही हाणामारी होते. एकमेंकीचे केस पकडून, जमिनीवर पाडत हा वाद तसाच सुरु राहतो. पण, काही वेळात घरातील काही सदस्य येतात आणि तरुणींचा हाणामारी सोडवतात. एक मजेशीर गोष्ट म्हणजे तरुणींची हाणामारी सुरु असताना तरुणांचा गट गाण्यावर डान्स करण्यात मग्न असतात.
सर्व घटना नेमकी कोणत्या गावातील आहे ते समजू शकलेले नाही. चार दिवसांपूर्वी व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mukeshkharte702 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर(Media) प्रचंड चर्चेत आलेला आहे. आतापर्यंत लोकांनी फेसबूक, एक्स अशा अनेक प्रसिद्ध माध्यमांवरही शेअर केलेला आहे.
टीप: हा तरुणींच्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.