Panipuri Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Panipuri Viral Video : काय सांगताsss? चॉकलेट सिरप आणि मँगो ज्यूसची पाणीपुरी; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Panipuri Viral Video: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे, ज्या माध्यमातून अनेक जण आपल्याकडील कला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतात. पण सध्या चॉकलेट सिरप आणि मँगो ज्यूसच्या पाणीपुरीची तुफान चर्चा होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Panipuri Viral Video

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी म्हटलं की रगडा आणि तिखड गोड चव असलेलं पाणी... पण हीच पाणीपुरी चॉकलेट सिरप आणि मँगो ज्यूसची दिली तर?

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडिया हा व्हायरल व्हि़डिओचा खजिना आहे. आपल्याला रोजच्या रोज नवनवीन व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. यात भंयकर अपघातांचे व्हिडिओ असतात तर; कधी क्षुल्लक गोष्टींवरून झालेल्या भांडणाचे असतात. मीडिया प्लॅटफॉर्म असा आहे, ज्या माध्यमातून अनेक जण आपल्याकडील कला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतात. त्यात कधी विविध डिझाईन्सच्या रांगोळ्या असतील, तर कधी अनेक रेसिपीचे व्हिडिओ असतात. पण सध्या चॉकलेट सिरप आणि मँगो ज्यूसच्या पाणीपुरीची तुफान चर्चा होतेय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात पाणीपुरीच्या २-३ पुऱ्या, बारीक चिरलेला कांदा तसंच पाणीपुरीच्या पुरीमध्ये भरले जाणारे बटाट्याचे मिश्रण आणि तिखट पाणी असे सर्व पदार्थ टाकतो. मग मिक्सरला फिरवून घेऊन ते मिश्रण एकदम बारीक केले जाते. बारीक केलेल्या मिश्रणात मँगो ज्यूस आणि चॉकलेट सिरप टाकतो. मग शेवटी पाणीपुरीचे मिश्रण एका ग्लासमध्ये टाकतो.

पाणीपुरीचा हा व्हिडिओ @food_badger_official या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ असतात; त्यात कधी मोमोज फ्लेव्हरचा चहा बनवला जातो, तर कधी बटरवाली चहा. तसंच फायर पाणीपुरी, विशेष म्हणजे एकदा चिकन आणि कोळंबी पाणीपुरीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत चार लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच लाइक्सचा वर्षाव झाला आहे. हा पाणीपुरीचा व्हिडिओ बऱ्याच नेटकऱ्यांना आवडलेला दिसत नाही, असे प्रतिक्रियांवरून दिसते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT