Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: ढीगभर सापांचा एकमेकांत गुंता; सुटका करताना सर्पमित्राचा घेतला चावा, पाहा थरारक VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर सापांचा गुंता आणि सर्पमित्र यांचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विविध जातीचे साप पकडताना सर्पमित्रांना जिवाची बाजी लावावी लागते. थोडी चूक झाली तरी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. सध्या सोशल मीडियावर सापांचा गुंता आणि सर्पमित्र यांचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती अज्ञात ठिकाणी पोहचलाय. इथे येताना त्याने आपल्यासोबत ढिगभर साप गोणीत भरून आणलेत. गोणीत एवढे साप एकत्र असल्याने हे सर्वच साप एकमेकांमध्ये गुंतले जातात. गुंतलेले साप सोडणवण्यासाठी हा व्यक्ती प्रयत्न करत आहे.

त्याने एक एक करत सर्व साप बाहेर काढलेत. मात्र यातील एक साप चांगलाच खवळतो आणि तो सर्पमित्रावर थेट हल्ला करतो. यावेळी सापाने सर्पमित्राच्या तोंडाचा चावा घेतलाय. काळजात धडकी भरवणारं हे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. सापाने चावा घेतला तरी देखील सर्पमित्र त्यांना सोडत नाही.

सापांचा सर्व गुंता सोडवून हा व्यक्ती त्यांना निसर्गअधिवासात नेऊन सोडतो. @snakeyuvaerode या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडिओला ३४ हजारांहून अधिक लाइक्स आणि लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज आलेत. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये भीती व्यक्त केलीये. तर काहींनी या सर्पमित्राचं कौतुक केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

Gold Rate Today: सोनं ₹१५०० तर चांदी १० हजारांनी महागली; सुवर्णनगरीतील १ तोळ्याचे दर किती? वाचा सविस्तर

Old Clothes Reuse Ideas: टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या जीन्स आणि टी- शर्टपासून घरच्या घरी बनवा स्टायलिश बॅग्स

SCROLL FOR NEXT