Crocodile Viral Vieo Saam TV
व्हायरल न्यूज

Crocodile Viral Vieo: पाण्यात पाय ठेवून तरुण निवांत बसला होता; अचानक मगर आली अन् पुढे जे घडलं ते भयंकरच

सोशल मीडियावर सध्या मगर आणि एका व्यक्तीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालाय.

Ruchika Jadhav

Man Treat Crocodile Like Pet: मगरीचं नाव ऐकताच अनेकांना पळता भुई थोडी होते. मात्र अनेक व्यक्ती सध्या जंगली प्राणी देखील पाळतात. या प्राण्यांसोबत ते अगदी निर्भीडपणे राहतात. सोशल मीडियावर सध्या मगर आणि एका व्यक्तीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालाय. (Latest Marathi News)

घरात पाळलेला कुत्रा किंवा मांजर यांच्याशी खेळायला प्रत्येकालाच आवडतं. त्यामुळे अनेक जण अशा पाळीव प्राण्यांसोबत मजामस्ती करताना दिसतात. अशीच मजामस्ती एक व्यक्ती चक्क मगरीसोबत करत आहे. व्हिडिओमध्ये मगर आणि या व्यक्तीमधील घट्ट मैत्री स्पष्ट दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती नदीत आपल्या बोटीत बसला आहे. बोटीतून त्याने पाण्यात पाय खाली सोडलेत. अशात अचानक त्याच्या पायांजवळ एक मगर येते. ही मगर त्याच्या पायाचा चावा घेणार की काय? असं वाटत असतानाच वेगळंच काही घडतं.

मगर या तरुणावर हल्ला करण्याएवजी त्याच्याशी मस्ती करू लगते. मगर या तरुणाच्या हाता जवळ येते. यावेळी तरुण मांसाचा एक तुकडा या मगरीच्या तोंडात टाकून देतो. त्यानंतर मगर पुन्हा आपल्या मार्गाने पुढे जाते.

मगर आणि तरुणाची मैत्री पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरलीये. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. ही मगर आहे की कुत्रा असा प्रश्न एकाने विचारलाय.

मगरीच्या (Crocodile) या व्हिडिओला तब्बल ४५ लाखांहून अधिक व्यक्तींनी पाहिलं आहे. अनेकांनी यावर कमेंटमध्ये तरुणाची काळजी व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT